नाशिक

पाळधीत जुगार अड्ड्यावर गोळीबार

CD
NSK26H34438 पाळधी : घटनास्थळी पाहणी करताना गुन्हे शाखेच्या पथकासह निरीक्षक राहुल गायकवाड व अधिकारी. --- पाळधीत जुगारअड्ड्यावर गोळीबार --- गुन्हे शाखेकडून पाहणी; खाली विद्यार्थी, ‘होस्टेल’वर चालायचा जुगार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : राष्ट्रीय महामार्गाला लागून विद्यापीठाजवळच निवांत निर्जनस्थळावर दोन मजली इमारत आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय, तर वरच्या मजल्यावर जुगार अड्डा चालविला जात होता. याच पाळधी शिवारातील अड्ड्यावर रात्री गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पाहणी केली. पाळधी शिवारात विद्यापीठालगत दोन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर जुगाराचा अड्डा चालविला जात असल्याचे समोर आले. या अड्ड्यावर सोमवारी (ता. २) रात्री गोळीबार झाला. जुगार खेळत असताना, झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, गोळीबार झाल्यानंतर इमारतीतील सर्व पसार झाले. वरच्या मजल्याला कुलूप लावले असून, घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (ता. ३) सकाळी पाळधी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हा संपूर्ण परिसर निर्जनस्थळी असल्याने जवळपास कोणीही आढळले नाही. मात्र, इमारतीजवळ पांढऱ्या रंगाची गाडी आढळली आहे. खाली विद्यार्थ्यांचा निवास इमारतीच्या खालच्या मजल्यावर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होती. पोलिस भरती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. घटना घडल्यानंतर सर्व विद्यार्थी भीतीने आपापल्या गावी निघून गेले असून, घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आलेला नाही. कोट गोळीबार झाल्याबाबतच्या कुठल्या खाणाखुणा नाहीत. कोणी प्रत्यक्षदर्शी अद्याप समोर आलेला नाही. घडल्या प्रकाराची कसून चौकशी सुरू असून, तथ्य आढळल्यास निश्‍चितच कारवाई होईल. - राहुल गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Beed News: बीड नगर परिषदेच्या सभेत रणकंदन! महिला नगरसेविकांच्या अवमानाचा आरोप; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT