नाशिक

पल्लव साहेबच्या जयघोषात वर्सी महोत्सवाची सांगता

CD
टुडे चार ४ मेन फिचर --- NSK26H34259 जळगाव : अंतिम दिवशी देशभरातून आलेल्या भाविकांची गर्दी. --- ‘पल्लव साहेब’च्या जयघोषात वर्सी महोत्सवाची सांगता संत-महात्म्यांच्या उपस्थितीत भाविकांकडून सुख, समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : सिंधी समाज बांधवांच्या वतीने आयोजित वर्सी महोत्सवाच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी रविवारी (ता. १) ‘पल्लव साहेब’ हा धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. पहाटेपासूनच संत-महात्म्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी तीनपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाने वर्सी महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पाचला संत बाबा हरदासराम साहेब आणि संत बाबा गेलाराम साहेब यांच्या देवरी साहेब (समाधीस्थळ) येथे पंचामृत स्नानाने झाली. त्यानंतर भजन-कीर्तनाचा कार्यक्रम झाला. देशभरातून आलेल्या संत-महात्म्यांच्या उपस्थितीत ‘पल्लव साहेब’ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ‘पल्लव साहेब’ या धार्मिक विधीद्वारे संत-महात्म्यांच्या माध्यमातून ईश्वराकडे सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाजातील एकता व शांततेसाठी प्रार्थना केली जाते. या वेळी संत-महात्म्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने रांगा लावल्या होत्या. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसह देशात शांतता आणि सर्व समाजांमध्ये बंधुभाव कायम राहावा, अशी प्रार्थना भाविकांनी केली. या कार्यक्रमाला साई राजेशलाल (अमरावती), मीरा अम्मा चोलेवारी (रायपूर), संत बाबा गेलाराम साहेब यांचे परमशिष्य देवीदास भाई, साई नितिनलाल (अयोध्या), साई किशोरीलाल (सतना), साई अर्जनदास (उल्हासनगर), साई हरीराम (उज्जैन), साई फकीराराम (नागपूर) आणि साई धीरजलाल (अमरावती) यांच्यासह विविध ठिकाणांहून आलेले संत-महात्मे उपस्थित होते. वर्सी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष राम कटारिया, नगरसेवक रमेश मतानी, माजी नगरसेवक अशोक मंधान, राजू अडवानी, जयरामदास कुकरेजा, शामलाल कुकरेजा, जगदीशलाल कुकरेजा, सतीश मतानी, लक्ष्मणदास वरयानी, किशोर विसराणी, राजकुमार वालेचा यांच्यासह ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सदस्य, पंचायत पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. चौकट देशभरातून भाविकांची उपस्थिती देशभरातून आलेले तसेच स्थानिक बाबांचे सेवेकरी आणि महिला भगिनींनीही विविध सेवांमध्ये सहभाग नोंदविला. महोत्सवाच्या चारही दिवसांत प्रशासन आणि पोलिस विभागाकडून योग्य बंदोबस्त व सहकार्य मिळाल्याबद्दल ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT