नाशिक

पांझरा नदीचे डबक्यात रूपांतर

CD
(पान ४ ला सेकंड मेन) WRS26B02892 कुडाशी (ता. साक्री) : येथे पाण्याअभावी डबक्याचे स्वरूप आलेले पांझरा नदीचे पात्र. ---------- पिंपळनेरच्या पश्‍चिम पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट गडद सप्टेंबर- ऑक्टोबरमध्येच पांझरा नदीचे डबक्यात रूपांतर सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. २७ : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस अत्यल्प झाल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. परिसरातील नद्या, नाले सप्टेंबर- ऑक्टोबरमध्येच कोरडे पडून त्यांचे डबक्यांत रूपांतर झाले आहे. पश्चिम पट्ट्याची जीवनवाहिनी असलेल्या पांझरा नदीचीही अशीच अवस्था झाली असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेती आणि पशुधनासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. पश्चिम पट्ट्यातील शेंदवड येथील भवानी डोंगरातून पांझरा नदीचा उगम होतो. शेंदवड, पिंपळनेर, साक्रीमार्गे धुळ्याकडे वाहणाऱ्या या नदीवर परिसरातील अनेक गावांची पाण्याची गरज अवलंबून आहे. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नदीचा प्रवाह लवकरच खंडित झाला आहे. कुडाशी (ता. साक्री) येथे नदीपात्रात पाण्याऐवजी ठिकठिकाणी डबकी दिसत असून, पावसाळा संपताच निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत असले, तरी पावसाअभावी कमी झालेला जलसाठा आणि कोरडी पडलेली नदीपात्रे पाहता भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि पाणी उपलब्धतेचे नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. भूजलपातळी खालावण्याची भीती यंदा पाऊस कमी झाल्याने जमिनीत अपेक्षित प्रमाणात पाणी मुरलेले नाही. परिणामी, विहिरींच्या पाणीपातळीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. नद्या-नाल्यांमधील पाणीसाठा कमी झाला असून, लहान- मोठे बंधारे आणि धरणांमधील जलसाठ्याची स्थितीही समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. चारा- पाण्याचा प्रश्न गंभीर होणार पश्चिम पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना कमी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या असून, जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागात आदिवासी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. त्यामुळे जनावरांना पुरेसे पाणी आणि चारा उपलब्ध करून देणे हे आगामी काळातील मोठे आव्हान ठरणार आहे.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT