Panchvati Express
Panchvati Express Google
नाशिक

नोकरदार-व्यावसायिकांची आवडती 'पंचवटी एक्सप्रेस' एक जुलैपर्यंत बंद

अंबादास शिंदे

नाशिक रोड : दिल्लीला रोज धावणाऱ्या मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (Mumbai Nizamuddin Rajdhani Express) प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने ही गाडी आठवड्यातून दोनदाच धावणार आहे. मनमाडहून मुंबईला रोज धावणारी व नोकरदार-व्यावसायिकांची आवडती पंचवटीही (Panchvati Express) १ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. (Panchavati Express will be closed till July 1)

मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष रेल्वे गाडी २९ जूनपर्यंत मंगळवार व शनिवारी आणि निजामुद्दीन- मुंबई राजधानी विशेष गाडी ३० जूनपर्यंत बुधवार आणि रविवारी चालविण्यात येणार आहे. नवीन सूचनेनुसार ही गाडी दररोज धावणार नाही. पंचवटी बंद असल्याने राज्यराणी, नंदीग्राम, तपोवन याच गाड्यांवर नाशिककरांची भिस्त आहे. कोरोनामुळे नागरिकांनी व्यवसाय, पर्यटन, शिक्षण आदी कारणांसाठी घराबाहेर पडणे बंद केले आहे. मुंबईहून दिल्लीला रोज धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधून सध्या पाच टक्केही प्रवासी प्रवास करत नाही. मुंबईला नोकरी, व्यवसाय, शिक्षण, पर्यटनासाठी जाणाऱ्या नाशिककरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस अत्यंत लाडकी आहे.

या गाडीलाही २५ टक्के प्रतिसाद लाभत आहे. अनेक जण खासगी वाहनांनी मुंबईला जात आहे. काहीजण कसारामार्गे लोकलने मुंबई गाठत आहे. त्यामुळे पंचवटीचाही तोटा वाढत आहे. मात्र, ज्यांना खासगी वाहन अथवा कसारामार्गे लोकलने जाता येत नाहीत, त्यांचे हाल होत आहेत. शिर्डी, नागपूर, अमरावती, जालनाच्या गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. २५ जून ते १ जुलैपर्यंत रद्द केलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे : दादर- साईनगर शिर्डी, पुणे-नागपूर, मुंबई- नागपूर, मुंबई- अमरावती, मुंबई- जालना, दादर- साईनगर शिर्डी, पुणे- अमरावती, पुणे- अजनी, कोल्हापूर- नागपूर, नागपूर- कोल्हापूर, नागपूर-अहमदाबाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT