नाशिक

पंचवटीतील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर

CD
टूडे साठी ---------------- पंचवटीतील शाळांना शनिवारी सुटी जाहीर शिक्षण विभागाचा आदेश; रस्ते बंद राहणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने पंचवटी विभागातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. मनपा शाळा, खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण ३५ शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, ३१ ऑक्टोबरला रामतीर्थ, पंचवटी येथे राष्ट्रपती यांच्या हस्ते कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. त्यादिवशी शनिवार असल्याने मनपाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते १०.०० या वेळेत वगळता सुटी असतीलचं, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने मालेगाव स्टँड, निमाणी, पंचवटी कारंजा या ठिकाणी रस्ते बंद राहणार आहेत. पोलिस विभागाच्या पत्राच्या अनुषंगाने राष्ट्रपतींच्या दौरा मार्गात कोणत्याही प्रकारची अव्यवस्था होऊ नये, सुटी जाहीर करण्यात आहे. तसेच या व्यतिरिक्त अन्य खाजगी संस्थांच्या शाळेस वाहतुकीस अडथळा वाटत असल्यास संस्थास्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, विद्यार्थी सुरक्षा प्राधान्याने लक्षात घेऊन कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे. सुटीच्या यादीत मनपा शाळा, खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण ३५ शाळांचा समावेश असून यामध्ये ए. पी. पटेल विद्यालय निमाणी, अभिनव बाल विकास मंदिर, आदर्श प्रायमरी इंग्लिश मिडियम, बाल शिक्षण मंदिर, ब्रह्मा व्हॅली, डी. एन. पाटील माध्यमिक विद्यालय, जे. एस. रुंगठा हायस्कूल, जनता विद्यालय, काकासाहेब देशमुख विद्यालय, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालय, एम. आर. सारडा कन्या विद्यामंदिर, मोहिनीदेवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिर, शासकीय मुलींची शाळा, के. टी. एच. एम. कॉलेज, के. व्ही. एन. नाईक कॉलेज, मराठा हायस्कूल, आर. के. कालानी ज्युनिअर कॉलेज, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, नवभारत प्रा. वि. मं. पंचवटी, मनपा शाळा क्र. ४०, ३६, १२, १३, ११, १०, ३७, ३८, ३९ आदी शाळांचा समावेश आहे. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Numerology: करिअरमध्ये मोठी रिस्क घ्यायला घाबरत नाहीत 'या' मूलांकाचे लोक; नवीन स्किल्स शिकण्यात असतात नंबर वन!

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

SCROLL FOR NEXT