Panchavatikar attended the meeting. esakal
नाशिक

Nashik News: कुंभमेळ्यात पंचवटीचा विकास व्हावा; बैठकीत नागरिकांची एकमुखी मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या निधी येतो. मात्र, ज्या पंचवटी परिसरात हा कुंभमेळा भरतो तोच भाग विकास दुर्लक्षित राहिला आहे.

आगामी कुंभमेळ्याच्या कामात पंचवटीतील गावठाण व कुंभमेळा भरत असलेल्या भागाकडे दुर्लक्ष होऊ द्यायचा नाही यासाठी प्रशासनावर पंचवटीकरांचा दबाव असावा, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. (Panchavati should be developed in Kumbh Mela One-sided demand of citizens in meeting Nashik News)

तपोवनातील आठवण लॉन्स येथे सामाजिक कार्यकर्ते नंदू पवार यांच्या पुढाकाराने बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीला महंत भक्तिचरणदास महाराज, काळाराम मंदिर, कपालेश्वर देवस्थान, गोदाप्रेमी संस्था, माजी नगरसेवक तसेच गेले चार सिंहस्थांचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

या वेळी पद्माकर पाटील, शरद कोशिरे, भगवान भोगे, देवांग जानी, मंडलेश्वर काळे, सचिन डोंगरे, सतीश शुक्ल, कृष्णकुमार नेरकर आदींनी मार्गदर्शन केले.

सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरत असताना शासनाकडून कोट्यवधी रुपये विकासकामासाठी येत असताना मूळ पंचवटीचा विकास न होता तो शहरातील इतर भागात खर्च केला जात असल्याचा आरोप उपस्थितांनी केला.

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू- महंत, भाविकांना सेवा व सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. त्या निधीचा जास्तीत जास्त वापर हा पंचवटीतील विकासकामासाठी झाला पाहिजे, अशी एकमुखी मागणी समोर आली.

येत्या काही दिवसात पंचवटीकरांकडून कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सूचना मागविण्यात येणार असून, त्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहे. सिंहस्थ ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या ४ कुंभमेळ्यात पंचवटीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता.

त्याच मंडळाच्या माध्यमातून आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक भगवान भोगे यांनी केले.

या वेळी सुधाकर चव्हाण, मंडलेश्वर काळे, मंदार जानोरकर, धनंजय पुजारी, पोपट इंगळे, नरेंद्र धारणे, राजेंद्रसिंह सैनी, विजय राऊत आदी उपस्थित होते. सचिन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. नंदू पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT