कामचुकार अधिकाऱ्यांना
शिक्षा करू, लक्ष ठेवणार
मुख्यमंत्र्यांच्या इशारा ः पंचायत राज अभियानात दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात राज्यातील काही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अशा अधिकाऱ्यांवर यापुढे लक्ष ठेवतानाच प्रसंगी त्यांना शिक्षा करु, अस इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. अभियानात ५० टक्क्यांहून कमी कामगिरी असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे पंचायतराज अभियान सोहळ्यातून जाहीर केली जातील, असा दमही फडणवीस यांनी भरला.
नाशिकमध्ये रविवारी (ता.११) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ चा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांबाबत जाहिर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून विकसित गावखेडींसाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यात पंचायतराज अभियान राबविण्यात आले. या अभियानात ५ हजार ६४४ ग्रामपंचायतींना सहभाग घेतला. त्यामध्ये गावांनी ८१४ कोटींची घरपटी तर २४१ कोटींची पाणीपट्टी वसुली केली. सर्वच गावांनी त्यांच्या पातळीवर उत्कृष्ट कार्य ऊभे केले. मात्र, विकसित गावांसाठी लोकसहभाग वाढत असताना काही जिल्हा परिषदांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी अभियानाकडे पाठ फिरवली. या अधिकाऱ्यांनी अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत मंत्री गोरे यांनी संबंधितांबद्दल काही निर्णय घेण्याची वेळ आल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री गोरे यांच्या तक्रारीचा धागा पकडून अधिकाऱ्यांची कानऊघडणी केली. यापुढे पंचायतराज अभियानात गुण दिले जातील. कामांमध्ये सहभाग न दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांचे मूल्यमापन करताना ५० टक्क्यांहून कमी गुण मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे कार्यक्रमात जाहीर केली जातील. कार्यालयांमधून नव्हे तर प्रत्यक्ष गावखेडींना भेटी देत विकसित गावांचा अजेंडा पुढे घेऊन जा, असा दमच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना भरला.
---
१६-१
त्या गावांना भेटी देणार
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात राज्यस्तरीय समितीने पुरस्कारासाठी १२ ग्रामपंंचायतींची निवड केली. या १२ गावांमधून अंतिमत: तीन पाच ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड झाली. त्यात प्रथम क्रमांकाचे एक तसेच द्वितीय व तृतीय क्रमाकांचे पुरस्कार विभागून देण्यात आले. यावेळी समितीने निवड केलेल्या १२ गावांना आपण स्वत: भेटी देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या भेटीप्रसंगी संबंधित गावांतील कामे, नाविन्यपूर्ण योजना व इतर उपाययोजनांची पाहाणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.