नाशिक

भगव्या पताकांनी सजली पंचवटी; ढिकले यांचे बॅनर ठरले लक्षवेधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा; प्रमुख रस्त्यांचे आकर्षक सुशोभीकरण

CD
फोटो : B14828 (जुना आहे) पंचवटी : दिंडोरी नाक्यावरील लक्षवेधी बॅनर -- भगव्या पताकांनी सजली पंचवटी; उत्सवी वातावरण पंचवटी, ता. ३ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणानिमित्त संपूर्ण पंचवटी परिसर भगव्या पताकांनी सजला होता. रस्त्यांच्या दुतर्फा करण्यात आलेली रंगरंगोटी, सिंहस्थाची बोधचिन्हे आणि भगवे ध्वज यामुळे पंचवटीला धार्मिक उत्सवाचे स्वरूप आले होते. दरम्यान, दिंडोरी नाक्यावरील आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे भगव्या रंगातील बॅनर नागरिकांसह भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पंचवटी परिसरात विशेष सजावट करण्यात आली होती. मालेगाव स्टॅन्ड ते मखमलाबाद नाका, मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, छत्रपती संभाजी महाराज नगर रोड, हनुमानवाडी ते चोपडा लॉन्स तसेच रामवाडी ते चोपडा लॉन्स या मार्गांवरील दुभाजकांमध्ये भगवे ध्वज लावण्यात आले होते. मालेगाव स्टॅन्ड ते रामतीर्थ आणि ढिकले सार्वजनिक वाचनालय ते रामतीर्थ या प्रमुख मार्गांवर विशेष सुशोभीकरण करण्यात आले. रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक रंगरंगोटी, सिंहस्थ कुंभमेळ्याची बोधचिन्हे असलेले फलक आणि भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतीही भगवे ध्वज आणि सिंहस्थाचे लोगो लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रमुख मार्गांवरील सजावट आणि स्वच्छतेमुळे पंचवटी परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी पंचवटीतील दिंडोरी नाक्यावर लावलेले बॅनर लक्षवेधी ठरले. भगव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या या बॅनरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जल अर्पण करतानाची आणि वंदन करतानाची छायाचित्रे झळकत होती. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कुंभनगरीत स्वागत आणि साधू-संत-महंतांचे स्वागत करणारे संदेशही देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT