Arrested
Arrested esakal
नाशिक

Nashik Crime News : पंचवटीतून कोयते, चॉपरसह दोघे जेरबंद दरोडा अन् शस्त्रविरोधी पथकाची कारवाई

नरेश हळणोर

नाशिक : पंचवटीतील गणेश वाडी उद्यान परिसरात कोयते, चॉपर अशी शस्त्रात्रे घेऊन आलेल्या दोघांना दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. संशयितांकडून चार कोयते व एक चॉपर अशी शस्त्रे जप्त करण्यात आली असून, पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Panchvati two arrested with axe chopper robbery and anti weapon squad action Nashik Crime News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

अंकुश मोतीराम जाधव (२०), श्रीकांत सुरेश मुकणे (१९, दोघे रा. शेरे मळा झोपडपट्टी, पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दरोडा व शस्त्रविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे यांच्या पथकास दोन संशयित हे गणेशवाडी परिसरात शस्त्रास्त्रे घेऊन येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, पथकाने बुधवारी (ता. ८) गणेशवाडी परिसरात सापळा लावला. त्यावेळी दोघे संशयित आले असता दबा धरून असलेल्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चार लोखंडी धारदार कोयते, आणि एक चॉपर अशी शस्त्रे मिळून आली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक किरण रोंदळ, प्रेमचंद गांगुर्डे, विजयकुमार सूर्यवंशी, भाऊसाहेब क्षीरसागर, शेख कादीर, श्रीशैल सवळी, कडुबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, विशाल जोशी, महेश खांडबहाले, मनिषा मल्लाह यांच्या पथकाने बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro-Khalistan slogans: सुवर्ण मंदिरात खलिस्तान समर्थनात घोषणा; भिंडरावालेचे पोस्टर झळकले, ऑपरेशन ब्लू-स्टारला 40 वर्षे

Vegan Diet : तरूणाईमध्ये वाढतेय व्हीगन डाएटची क्रेझ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Share Market Opening: सरकार स्थापनेच्या आशेने बाजार तेजीत; सेन्सेक्स 500 अंकांनी बहरला

Hardik Pandya-Natasa Stankovic : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाची 'पांड्या'बाबतची 'ती' पोस्ट चर्चेत; इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत....

VIDEO: अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या 'अंगारों' गाण्यावर थिरकले ऐश्वर्या आणि अविनाश नारकर; भन्नाट डान्सची होतीये चर्चा

SCROLL FOR NEXT