नाशिक

पांढुर्ली उपबाजारात टमाटे साठ ते सत्तर रुपये प्रति क्रेट

CD
PNH26B07580 पांढुर्ली ः येथील उपबाजारात गुरुवारी झालेली टोमॅटोची आवक.- --------------------- पांढुर्ली उपबाजार आवारात टोमॅटो दरात पुन्हा घसरण ----------------- क्रेटला अवघा पन्नास ते सत्तर रुपये भाव ----------- सकाळ वृत्तसेवा पांढुर्ली, ता.२२ : सिन्नर बाजार समितीच्या येथील उपबाजारात गुरुवारी (ता.२२) टोमॅटोचा भाव पन्नास, साठ ते सत्तर रुपये प्रती क्रेट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या आठ दिवसात अडीचशेवरून थेट सत्त रुपयांवर भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे. -------------- मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने बाजार समितीचे आवार टोमॅटोच्या वाहनांनी आणि शेतकऱ्यांनी फुलून गेले होते. उपबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने पुढे नेण्यासाठी चढाओढ झाल्यामुळे रहदारी ठप्प झाली होती. अशा परिस्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकरी ढासळलेल्या बाजारभावामुळे कमालीचा वैतागून गेला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा खते, बियाणे, रोपे, औषधे, मजुरी या भांडवलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्या तुलनेत टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील उपबाजार आवार नुकतेच सुरु झाले आहे. या बाजारात शिवडे, पांढुर्ली, विंचूर दळवी, शेणीत, बेलू, आगसखिंड, सावतामाळी नगर, घोरवड, भरवीर येथील शेतकरी टोमॅटो आणत आहेत. टोमॅटो बाजारात आणणे, तोडणे ३० रुपये प्रती क्रेट व भाडे २० रुपये प्रति क्रेट व हमाली २ प्रती क्रेट असा ५२ रुपये प्रती क्रेट खर्च येत आहे आणि बाजारभाव केवळ ६०ते ७० रुपये प्रती क्रेट मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने टोमॅटोची निर्यात करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यावर्षी दुष्काळ असल्याने पुढील हंगामात पिके येणार नाही. त्यामुळे सरकारने लवकर लवकरात याची दखल घ्यावी व मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे उत्तमराव हारक यांनी केली आहे. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : शिक्षक नियुक्तीच्या पारदर्शकतेवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब; शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम

Vitamins Tips: कोणतं व्हिटॅमिन कधी घ्यावं? जाणून घ्या योग्य वेळ आणि महत्त्वाच्या गोष्टी!

Latest Marathi News Live Update : CJP च्या आंदोलनाशी माझा संबंध नाही’; नेहा बोरा यांचा न्यायालयात दावा

Narendra Modi: इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे मोदी खास पाहुणे! नेतान्याहूंनी आणखी कोणाला दिले निमंत्रण?

उत्तराखंडमधील मदरशांची शुक्रवारची सुट्टी रद्द? आता रविवारची साप्ताहिक सुट्टी लागू करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT