धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H34785
धुळे : शहरातील पांझरा नदीतील केटीवेअर बंधाऱ्यात ‘पाणी अडवा’ या मागणीचे निवेदन आमदार अनुप अग्रवाल यांना देतांना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी.
---
पांझरेतील बंधाऱ्यात पाणी अडवा
---
संभाजी ब्रिगेडची आमदार अग्रवाल यांच्याकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : अल्प पावसामुळे आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पांझरा नदीवरील केटी वेअर बंधाऱ्यांमध्ये लोखंडी पाट्या बसवून पाणी अडविण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे केली.
यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनाची आमदार श्री. अग्रवाल यांना दिली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आमदार श्री. अग्रवाल यांच्याशी या विषयावर चर्चाही केली. पांझरा नदीवरील सिंधी कॉलनीजवळ तसेच प्रभातनगर परिसरातील केटी वेअर बंधाऱ्यांमध्ये लोखंडी पाट्या बसविण्याची आवश्यकता पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. बंधाऱ्यांमध्ये पाट्या नसल्यामुळे नदीपात्रातील पाणी वाहून जात आहे. याठिकाणी पाट्या बसवून पाणी अडविल्यास त्याचा साठा वाढण्यासह धुळे शहरातील भूजलपातळी वाढण्यास आणि परिसरातील पाणी उपलब्धतेस मदत होऊ शकते, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. चर्चेदरम्यान आमदार अग्रवाल यांनी आंदोलन स्थगित करण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आगामी काळात पांझरा नदीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल, त्यावेळी संबंधित केटी वेअर बंधाऱ्यांवर लोखंडी पाट्या बसवून पाणी अडविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
नदीतील पाणी अडविण्याच्या मागणीबाबत आमदारांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याने संभाजी ब्रिगेडने तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नदीला आवर्तन सोडताना बंधाऱ्यांवर लोखंडी पाट्या बसविण्यात आल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला.
दरम्यान, धुळे शहरातील सावरकर पुतळ्यासमोरील अंजनशा दाता सरकार परिसरातील पुलाचे काम नव्याने करण्यात येणार असून, या पुलाची उंचीही वाढविण्यात येणार असल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी दिली. या पुलाच्या ठिकाणीही संभाजी ब्रिगेडच्या मागणीनुसार पाट्या बसवून पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. या भेटीप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री. भडक, जिल्हा सचिव महेश पाटील, अमर फरताडे, गोकुळ देवरे, धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.