नाशिक

शिक्षक समन्वय समिती निवेदन

CD
पान दोन ---------------- 34547 धुळे : पारधी वस्ती शाळेतील मुख्याध्यापकांचे निलंबन मागे घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांना निवेदन देताना जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकारी. -- मुख्याध्यापक परदेशी यांचे निलंबन मागे घ्या प्राथमिक शिक्षक समन्वय समितीची निवेदनातून मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : पारधी वस्ती (ता.धुळे) जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक किशोर धनजी परदेशी यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेऊन त्यांना पूर्ववत सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. ५) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शाळेतील तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र सदर प्रकरणात संपूर्ण वस्तुस्थिती, त्यांची वैद्यकीय परिस्थिती, त्यांची बाजू तसेच शाळेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी भूमिका संघटनेने मांडली. शाळेत पायाभूत सुविधांचा अभाव असताना केवळ मुख्याध्यापकांना जबाबदार धरणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून मुख्याध्यापक परदेशी यांचे निलंबन रद्द करावे आणि पारधी वस्ती शाळेत आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सांगितल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, श्रीकृष्ण सावळे, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र भामरे, विश्वनाथ सोमवंशी, मिलिंद वसावे, राजेंद्र मदन भामरे, शरद पाटील, सुधीर पाटील, भटू पाटील, रामदास सोनवणे, धिरज परदेशी, अविनाश काकुळदे, भास्कर परदेशी, अतुल पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

SCROLL FOR NEXT