Crime News esakal
नाशिक

Parakh Credit Institution Scam Case : पोलिस शोधताय Golden Shirt; अजय जैनचाही शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येवल्यातील पारख पतसंस्थेतील सुमारे २२ कोटींच्या अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेले येवल्याचे माजी नगराध्यक्ष पंकज पारख यांचा गोल्डन शर्ट (सोन्याचा शर्ट) पोलिस शोधत आहेत.

नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (ता. ३) पारख यांना नाशिकमधून अटक केली होती. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित अजय जैन याचाही पोलिस शोध घेत आहेत.

येवला शहर पोलिसांत येवला सहायक निबंधक प्रताप पाडवी यांच्या फिर्यादीवरून (कै.) पारख नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी २२ नोव्हेंबर २०२१ ला गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्यात संस्थापक पंकज पारखसह अध्यक्ष योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि चार वसुली अधिकाऱ्यांसह दहा संचालकांचा समावेश आहे. (Parakh credit institutions scam case police looking for golden shirt of Pankaj Parekh former mayor of Yeola search for Ajay Jain is also on Nashik News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

पंकज पारख येवल्याचे माजी नगराध्यक्ष असून, २०१४ मध्ये त्यांनी स्वत:च्या वाढदिवसाला नाशिकच्या सराफांकडून सव्वाकोटी रुपयांचा व चार किलोचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला होता. या सोन्याच्या शर्टमुळे ते येवल्यातच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध झाले होते. त्याच सोन्याच्या शर्टचा ग्रामीण पोलिस शोध घेत आहेत.

पारख यांना अटक करण्यात येऊन येत्या शुक्रवारपर्यंत (ता.१०) त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी झालेले पारख यांच्या पोलिस चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

पोलिसाकडून येत्या काही दिवसांत पारख यांच्या येवल्यातील घराचीही झडती घेतली जाण्याची शक्यता आहे. पतसंस्थेचे व्यवस्थापक अजय जैन याचाही पोलिस शोध घेत आहेत. त्याच्या मागावर काही पथके रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT