नाशिक

पारोळा रथोत्सवातील चोरीप्रकरणी एकास अटक

CD
पारोळा रथोत्सवातील चोरीप्रकरणी एकास अटक बीडमधून ताब्यात; ४७ ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव/पारोळा, ता. ३ : पारोळा येथील रथोत्सवात झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून चोरणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून अटक केली. गणेश कचरू पवार (वय ४०, रा. अयोध्यानगर, बहिरवाडी, बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन सोनसाखळी हस्तगत केल्या असून, त्यांची किंमत सहा लाख ११ हजार रुपये आहे. पारोळ्यात २२ ऑक्टोबरला झालेल्या रथोत्सवात तीन ते चार जणांनी अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून तोडले आणि तेथून पोबारा केला होता. या प्रकरणी २५ ऑक्टोबरला पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्वतंत्र पथक नियुक्त केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित बीड शहरातील असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याचे नाव गणेश पवार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथक बीडला रवाना झाले. पारोळा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हितेश चिंचोरे तपास करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संतोष पवार, कर्मचारी हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, राहुल कोळी, विलास गायकवाड, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील आणि चालक रिजवान शेख यांनी केली. चौकट आठ दिवसांची शोध मोहीम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड शहरात सलग आठ दिवस ठाण मांडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला. संशयिताने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोन पंच आणि सोनार यांच्या उपस्थितीत त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade : हार्दिक पांड्याची चर्चा सुरू असताना सूर्यकुमार यादवच्या ट्रेडचा 'बाऊन्सर' पडला; Mumbai Indians ने काय निर्णय घेतला?

Maharashtra Rain : दिवाळीला धोधो कोसळणार ! 'या' १२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; विजांच्या कडकडाटासह सरींची शक्यता, ‘मुरासू’ चक्रवादळही निवळणार

Vaibhav Sooryavanshi ला फक्त १५ व्या वर्षी उपकर्णधार करणे योग्य आहे? सचिन तेंडुलकरने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर, 'खूपच घाई...'

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Beed News: बीड नगर परिषदेच्या सभेत रणकंदन! महिला नगरसेविकांच्या अवमानाचा आरोप; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT