NSK26H33866
जळगाव : स्क्वॉश स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेला ए. टी. झांबरे विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ दंडगव्हाळ.
राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत
पार्थ दंडगव्हाळची निवड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव आणि जिल्हा हौशी स्क्वॉश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विभागस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत ए. टी. झांबरे विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी पार्थ उमेश दंडगव्हाळ याने उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित या स्पर्धेत पार्थने आपल्या खेळातील कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले. त्याच्या या निवडीमुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पार्थला एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रमुख श्रीकृष्ण बेलोरकर, प्रशिक्षक शुभम शिसोदे, क्रीडाशिक्षिका निराशा सोनवणे आणि डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे तसेच विद्यालयातील शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.