cctv esakal
नाशिक

महापालिका मुख्यालयात ओल्या पार्ट्यांचा धडाका! CCTV मुळे झाला खुलासा

विक्रांत मते

नाशिक : कोरोना विरुद्धच्या (corona virus) लढाईत पालिकेचे कर्मचारी गुंतले असताना दुसरीकडे काही कर्मचारी मात्र राजरोसपणे मुख्यालयाच्या (nashik muncipal corporation) तिसऱ्या मजल्यावर ओल्या पार्ट्या झडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महापालिका मुख्यालयात ओल्या पार्ट्यांचा धडाका!

महापालिका मुख्यालयातील बहुतांश कर्मचारी हे कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय आहेत. पालिका मुख्यालयात कोरोनामुळे बाहेरच्या व्यक्तींवर प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. फारच महत्वाचे काम असेल तर ई-मेलद्वारे संपर्क साधावा किंवा संबंधित विभागाच्या प्रमुखांची पर लेखी परवानगी घ्यावी असे आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यालय सुने पडले असताना त्याचा फायदा घेत काही कर्मचाऱ्यांकडून ओल्या पार्ट्या झाडल्या जात आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या राउंड मध्ये हा प्रकार उघडकीस आल्याने गुरुवारी रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश

मुख्यालयातील तिसऱ्या मजल्या वर आज सकाळी अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी चक्कर मारली असता दारूच्या बाटल्या, खाण्याचे पदार्थ, तंबाखू, बिडी , सिगारेट चे पोकेट्स आढळून आले. पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे आहे. मंडळाचे 15 ते 20 सुरक्षा कर्मचारी चारही प्रवेशद्वारांवर तैनात आहे. अशा परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळेस दारूच्या बाटल्या कोण घेऊन गेले, मुख्य प्रवेश दारावर स्कॅनिंग का झाले नाही, झाले असेल तर त्यात दारूच्या बाटल्या आढळून आल्या की नाही, शहरात दारू बंदी असताना संबंधित व्यक्तींकडे बाटल्या कुठून आल्या या संदर्भातील चौकशी करण्याच्या सूचना सुरक्षा विभागाला देण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील पालिका मुख्यालयात , पश्‍चिम विभागात ड्युटीवर असताना जुगार खेळणे पार्ट्या जोडण्याची प्रकार लक्षात आले होते. दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात काही कर्मचारी निलंबित करण्यात आल्यानंतर या प्रकाराला आळा बसला होता. परंतु आता पुन्हा दारूच्या पार्ट्या जोडण्याचे व तेही मुख्यालयात असे प्रकार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पालिका मुख्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्ट्या होत असल्याचे आढळून आले असून या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासून पार्ट करणाऱ्यांना व त्यावेळी जे सुरक्षा कर्मचारी ड्युटीवर होते. त्यांना नोटिसा बजावण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. - सुरेश खाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT