Nashik Bus Fire esakal
नाशिक

Nashik Bus Fire : शिर्डीला जाणाऱ्या प्रवासी बसला आग; 18 भाविक करत होते प्रवास

अजित देसाई

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर रविवारी (ता. २९) पहाटे मुंबई येथून शिर्डी कडे जाणाऱ्या साई भक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घोरवडघाटनजीक घडलेल्या या घटनेत गाडी संपूर्ण जळून खाक झाली.

गाडीमधील सर्व 18 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मुंबई येथून शिर्डीच्या दिशेला अठरा प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी टेम्पो ट्रॅव्हल गाडी (MH04 GP0484) ही गाडी घोरवड घाटातून पहाटे साडेपाच वाजेच्या जात असताना गीताई पेट्रोल पंपा समोर गाडीमधून अचानक धूर निघू लागला. चालकाने प्रसंगा वधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. गाडीतील सर्व अठरा प्रवाशांना सुरक्षित खाली उतरून दिले. त्यानंतर गाडीने क्षणार्धात पेट घेतला.

या घटनेत गाडी संपूर्ण जळून खाक झाली. प्रवाशांचे सामान सुद्धा जळून गेले. घटनेची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिकेची अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. सिन्नर पोलिसांचे मदत पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निवृत्ती गीते, गौरव सानप हे पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT