puja esakal
नाशिक

पौरोहित्‍यातून मिळाला यशस्वितेचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चेतनानगरमधील नंदा देशपांडे यांच्या मैत्रिणींचा ग्रुप गीतापठण करीत असताना, मैत्रिणीने दिलेल्या प्रेरणेतून पौरोहित्‍याकडे त्‍यांचा प्रवास सुरू झाला. ‘सकाळ’शी संवाद साधताना त्‍यांनी त्‍यांचे अनुभव कथन केले. (Latest Marathi News)

नंदा देशपांडे यांचे माहेर आणि सासर नाशिकचेच. माहेरी वडील पोलिस खात्‍यात असल्‍याने फारसा वेळ त्‍यांना घरासाठी देता येत नव्हता. आई धार्मिक होती. आईच्या इच्छा होती, की गीतेचा अभ्‍यास करावा. यामुळे त्यांनी अभ्‍यास सुरू केला. गीतेच्या अभ्यासासाठी गीता वाचन मंडळ म्‍हणून २५ मैत्रिणींचा ग्रुप होता. गीतापठण ऐकून मैत्रिणीने सुचविले असता, स्‍मिता आपटे यांच्याकडून पौरोहित्य शिकण्याचे ठरविले आणि १९९५ मध्ये वर्गात प्रवेश घेतला. त्‍यांच्याकडे ७ ते ८ वर्ष शिक्षण घेतले. शिक्षण घेताना पौरोहित्‍यात आवड आपोआप निर्माण झाली. तसेच कुतूहल वाढत जाऊन पुढचे शिक्षण घेतले. अनघा चिपळूणकर यांची भेट होऊन आध्यात्मिकतेसाठी त्‍यांचे मार्गदर्शन लाभले. घरूनही पाठिंबा मिळाला.

मंत्रपठणातून आवड वाढत जाऊन दासबोध, ज्ञानेश्‍वरी, गीता, तुकारामांची गाथा याचेही ज्ञान घेतले. ज्ञानेश्‍वरी परीक्षेत महाराष्‍ट्रातून त्‍‍या चौथ्या आल्‍या. तुकाराम गाथा यात पाचव्‍या क्रमांकाने यश मिळाले. त्‍यांचे लिखाणही सुरू आहे. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. जुनी अकरावी झालेल्‍या नंदा देशपांडे म्हणाल्या, की वेगवेगळ्या विषयात रमत गेले व सहजतेने परीक्षा देत हातून सेवा घडत गेली. यश मिळत गेले. पौराहित्‍यातील अनुभव सांगताना त्‍या म्‍हणाल्‍या, की पूजा झाल्‍यानंतर यजमानांच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद, तसेच त्‍यांनी केलेली प्रशंसाने मन आनंदित होऊन जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT