corona medical team.jpg
corona medical team.jpg 
नाशिक

रुग्णाकडे क्वारंटाईन सेंटरमधील विदारक परिस्थितीचा व्हिडिओ..अन् मुख्याधिकारी म्हणतात "ही तर पालिकेची बदनामी"..!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सटाणा : शहरातील एका लग्नघरातील नवरीचे आई-वडील कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या चाळीसहून अधिक नातलगांना प्रशासनाने या विलगीकरण केंद्रात हलविले आहे. मात्र या केंद्रात आणि प्रसाधनगृहात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि मिळणारे जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यांच्यापैकी एका रुग्णाने सेंटरमधील सर्व परिस्थितीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

त्यावर मुख्याधिकारी म्हणतात, "ही पालिकेची बदनामी' 

त्यात अस्वच्छता आणि घाणीच्या साम्राज्यामुळेच एखाद्या चांगल्या व्यक्तीलासुद्धा कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता असल्याचा उल्लेख कोविड सेंटरमधील रुग्णांनी व्हिडिओत केला आहे. मात्र सटाणा पालिकेने बुधवारी (ता. 8) प्रसिद्धीपत्रकाद्वारे काही समाजकंटकांकडून पालिकेची विनाकारण बदनामी केली जात असल्याचे सांगितले. सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी कोविड सेंटरची जबाबदारी प्रशासकीयदृष्ट्या नगर परिषदेची नसून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र पालिका प्रशासनाने सामाजिक जबाबदारी म्हणून सेंटरमध्ये वेळोवेळी विविध सेवा-सुविधा पुरविल्या असताना असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे श्रीमती डगळे यांनी सांगितले. 

पदाधिकाऱ्यांची भेट

बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी बुधवारी (ता. 8) राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे व अमोल पगार यांच्यासह या कोविड सेंटरला भेट दिली. श्री. चव्हाण यांनी गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांना सेंटरमधील स्वच्छता आणि रुग्णांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या. 

(संपादन - ज्योती देवरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT