senior citizen hospital.jpg 
नाशिक

रुग्णांची टोकनद्वारे होणार खासगी रुग्णालयात भरती; ट्रॅकिंगद्वारे ठेवणार नजर

विक्रांत मते

नाशिक : खासगी रुग्णालयात महापालिकेच्या माध्यमातून रुग्ण भरती करताना आता टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. या माध्यमातून रुग्ण भरती होण्यापासून रुग्णालयाचे बिल अदा करण्यापर्यंत सर्व प्रकारचे ट्रॅकिंग होऊन वैद्यकीय सेवेसंदर्भात सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत असलेली नाराजीची भावना दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्थायी समितीने वैद्यकीय विभागाला तसे आदेशित केले असून, प्रत्येक रुग्णाला टोकन देण्याच्या सूचना केल्या आहेत. 

स्थायीचे वैद्यकीय विभागाला आदेश; सर्व प्रकारे ट्रॅकिंग 
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना खाटांची संख्या कमी पडत आहे. त्यातल्या त्यात सध्या ऑक्सिजन कमी पडत असल्याची नवी समस्या समोर आल्याने प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. नगरसेवकांकडून फोन जाऊनही रुग्णांना भरती केले जात नाही. अनेक रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत असल्याचा मुद्दा स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर, राहुल दिवे, सत्यभामा गाडेकर, कमलेश बोडके, समिना मेमन, प्रा. शरद मोरे यांनी मांडला. त्यामुळे टोकन पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवक, महापालिका रुग्णालयातून खासगी रुग्णालयात रुग्ण भरती होताना त्याला टोकन दिले जाईल. कुठल्या दिवशी तो भरती झाला इथपासून ते त्याला आकारलेले बिलदेखील या माध्यमातून तपासले जाणार आहे. 

मेडिक्लेमला नकार; शासनाकडे तक्रार 
शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांत मेडिक्लेम विमा असूनही रुग्णांना त्या माध्यमातून उपचारासाठी नकार दिला जात आहे. त्यामुळे मेडिक्लेम नाकारणाऱ्या रुग्णालयांची चौकशी करून शासनाकडे तक्रार केली जाणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील डॉक्टर, स्टाफ, नर्सची पदे रिक्त असून, कायमस्वरूपी पदे भरण्यासाठी कोविडच्या धर्तीवर शासनाकडे परवानगी मागितली जाणार असल्याची माहिती सभापती गणेश गिते यांनी दिली. 

संपादन ृ- ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT