hrct esakal
नाशिक

एचआर-सीटी तपासणीतून नाशिकच्या रुग्णांचे वाचले साडेबावीस लाख

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : २ मे २०२१ ला नाशिक रोड येथील बिटको कोविड सेंटरमध्ये (bytco covid center) एचआर-सीटी (HRCT) तपासणी सुरू झाल्यापासून सामान्य गरीब, रुग्णांचे आजपर्यंत तब्बल २२ लाख पन्नास हजार रुपये वाचले आहेत. आजपर्यंत एक हजार ४०० रुग्णांची एचआर-सीटी तपासणी पूर्ण झाली असून, प्रत्येक तपासणीमागे किमान हजार ते पंधराशे रुपये प्रत्येकी एका रुग्णाला फायदा झाला आहे. (patients-saved-money-From-HR-CT examination-jpd93)

सामान्य गरीब, रुग्णांचे आजपर्यंत तब्बल २२ लाख पन्नास हजार रुपये वाचले

खासगी रुग्णालयात एचआर-सीटी तपासणीचे अडीच ते तीन हजार रुपये घेतात. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एचआर-सीटी तपासणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी व्हायला लागली होती. ही गर्दी पाहून नाशिक महापालिकेने अंदाजे तीन कोटी रुपयांचे १६० स्लाइडचे मशिन बसण्याचा निर्धार केला. २ मेपासून हे मशिन कार्यरत आहे. आजपर्यंत तीन महिन्यांमध्ये तब्बल एक हजार चारशे लोकांची एचआर-सीटी तपासणी झाली असून, बिटको रुग्णालयात एचआर-सीटी तपासणी करायची असल्यास इनडोअर रुग्णांना हजार रुपये व आउटडोअर रुग्णांना दीड हजार रुपये लागतात. खासगी ठिकाणी हीच तपासणी अडीच ते तीन हजार रुपयांमध्ये होत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण बिटको हॉस्पिटलमध्ये ही तपासणी करीत आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील अनेक रुग्णांचे पैसे वाचले आहेत. यासाठी डॉ. प्रीती आहेर, डॉ. संतोष बोरसे हे रेडिओलॉजिस्ट तन-मन-धनाने काम करीत आहेत. संदीप शेवाळे, स्वप्नील बोराडे, कृष्णा अहिरे, अरबाज शेख, कृष्णा डुकरे, दिलीप गोरे, भारत गायकवाड हे टेक्निशियन हिरिरीने काम करीत आहेत. खासगी हॉस्पिटललाही या सुविधेचा फटका बसला असून, त्यांनीही दर नियंत्रणात आणण्याचे ठरविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार काकांनी केला ठेकेदार पुतण्याचा पर्दाफाश, बनावट कागदपत्रे जोडून जिल्हा परिषदेची फसवणूक; गुन्हा दाखल

Train Ticket Booking Tips: ट्रेन तिकीट बुक करताय? मग आधी 'हे' एक काम करा,मिळेल कन्फर्म तिकिट

Latest Marathi News Live Update : रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज, पक्षश्रेष्ठी यांच्याकडे तक्रार

Satara Doctor Case: 'आरोपींवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही', Rupali Chakankar संतापल्या | Sakal News

Sangli Theft Cases : सांगलीत मंगळसूत्र चोरांची संख्या वाढली, भर बाजारात चोरांनी दिलं पोलिसांना आव्हान

SCROLL FOR NEXT