isolation beds google
नाशिक

स्वतंत्र खोली नसलेले नागरिक होणार कोविड सेंटरमध्ये दाखल

विक्रांत मते

महापालिकेने आता होमआयसोलेशनमध्ये (home isolation)असलेल्या, परंतु स्वतंत्र खोली नसलेल्या नागरिकांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी होम आयसोलेशनमधील रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

नाशिक : शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग कमी होत असला तरी मृत्युदर मात्र एक टक्का कायम आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शिथिल होणाऱ्या लॉकडाउनच्या (Lockdown) प्रक्रियेत नाशिकचा समावेश होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. दरम्यान, महापालिकेने आता होमआयसोलेशनमध्ये (home isolation)असलेल्या, परंतु स्वतंत्र खोली नसलेल्या नागरिकांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी होम आयसोलेशनमधील रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. (patients who do not have a separate room will be admitted into covid care center)


गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोनाच्या दुसरा लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली. मार्च व एप्रिल महिन्यात एक लाखांवर अधिक रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्युदरातही सातत्याने वाढ झाली. शहरात ०.५९ टक्के मृत्यू दर होता. आता एक टक्क्यांवर मृत्युदर पोहोचला आहे. १ जूनपासून लॉकडाऊन प्रक्रिया शिथिल केली जाणार आहे. त्यापूर्वी मृत्युदर अधिक असलेले जिल्हे रेड झोन म्हणून जाहीर केले जाणार आहे. रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन अधिक कडक राहील. वाढत्या मृत्युदरामुळे नाशिक रेड झोनमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने रेड झोनचा शिक्का पुसण्यासाठी होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करून ज्या रुग्णांना स्वतंत्र खोली नाही. अशा रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांना महापालिकेच्या नवीन बिटको, समाज कल्याण, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, संभाजी राजे स्टेडिअममध्ये कोविड सेंटरमध्ये भरती करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.


अडीच हजार रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

कोरोना दुसरी लाट आल्यानंतर महापालिकेने ८५ टक्के रुग्ण होमआयसोलेशनमध्ये ठेवले होते. पुढे ९० टक्क्यांपर्यंत संख्या पोहोचली. सध्या शहरात ५८१३ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यातील अडीच हजार रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या घरी भेट देवून त्यांच्याकडे स्वतंत्र खोली आहे की, नाही याची पाहणी केली जाणार आहे. स्वतंत्र खोली नसल्यास कोरोनाबाधित रुग्णांना पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचे प्रयत्न सुरु केले जाणार आहे. होम आयसोलेशन नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

साडी नेसलेला सचिन जोरात ओरडला आणि रिक्षावाला घाबरला... निवेदिता यांनी सांगितला 'बनवाबनवी'च्या शूटिंगचा किस्सा

Latest Marathi News Live Update : ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात बिहार निवडणूका

Chakan Nagarparishad Election : कही खुशी, कही गम ! चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण

Manchar Nagarpanchyat Election : नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड; मंचर नगरपंचायत नगराध्यक्षपद ओ.बी.सी. महिलेसाठी राखीव

SCROLL FOR NEXT