Senior leader of farmers association Ramchandrabapu Patil and all members while keeping the tradition of Diwali together with family esakal
नाशिक

Diwali Festival: पाटील कुटुंबीय जपतेय एकत्र दिवाळीची परंपरा! शतकापासूनची प्रथा नवी पिढीही जपतेय

गोविंद अहिरे

नरकोळ : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाची पेरणी करणारा हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा सण. हा आनंदोत्सव आजच्या युगात सर्व कुटुंबीयांनी एकत्रितपणे साजरा कऱणे तसे दुर्मिळच झाले आहे.

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबे विभागली गेली आहेत, त्यामुळे सर्वांनी एकत्र येत दिवाळी साजरी होणे अपवादानेच, मात्र शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांनी कुटुंबाला एकत्र ठेवत ही परंपरा राखली आहे. पंचक्रोशीत नव्हे तर तालुकाभर त्यांच्या या परंपरेची चर्चा आहे. (Patil family preserving tradition of Diwali together new generation also preserving centuries old custom nashik)

मुळाणे (ता. बागलाण) येथील रहिवासी असलेल्या बापूंनी शेतकरी संघटनेत काम करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला, शेतकऱ्यांना न्या मिळवून देत त्यांनी लढवय्या बाणा जपताना कुटुंबाकडेही तेवढेच लक्ष दिले आहे.

त्यांच्यावर संस्काराचे शिंपण करत त्यांनी कुठेही असले तरी दिवाळीला सर्वांनी एकत्र यायचेच हा सक्तीचा नव्हे तर संस्कृतीचा भाग म्हणून कुटुंबीयांना पटवून दिले आहे.

ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या पाच भावंडांचे कुटुंब. एकत्रित कुटुंबाची दिवाळीची शतकापासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे. ही परंपरा नवीन पिढीला आदर्शवत ठरत आहे.

बापूंचे वडील माजी पोलिस पाटील, दिवंगत नारायण पाटील व त्यांचे बंधू शंकर, लक्ष्मण यांनी सुरू केलेली एकत्रित दिवाळी ही या परिवाराची संस्कृती टिकून ठेवणारी असल्याने परिसरातून कौतुक होत आहे.

यानिमित्त भावाभावामधील एकोपा वाढीस लागतो, बालकांच्या बालमनावर चांगले संस्कार घडतात, हे ते आवर्जून सांगतात.

या दिवाळीसाठी भाऊ, बहिण, मुलेमुली, नातू, सुना, एकत्र आल्यामुळे एकमेकांच्या शैक्षणिक गप्पाबरोबर सामाजिक, गप्पांमध्ये आनंद मिळतो, हे सर्व श्रेय आजही हे कुटुंब बापूंना देत आहेत.

"वडिलांसह चुलत्यांनी दिलेला एकत्रित दिवाळीची शिकवण टिकवून ठेवली, मुलेही ही परंपरा चालवित आहेत. यामुळे कुटुंबात एकोपा राहतो, दिसतो हे पाहून मन समाधानी होते, ही परंपरा पुढील पिढीही अशीच टिकवून ठेवेल ही आशा आहे."

- रामचंद्रबापू पाटील, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sikandar Shaikh Crime : पैलवान सिकंदर शेखच्या अटकेनंतर घरच्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

विश्वास बसत नाही, रोहित आर्याबद्दल काय म्हणाले गिरीश ओक? ओलीस नाट्याच्या आदल्या दिवशी गेलेले स्टुडिओत

Chandrapur Accident: बाबा मला कार शिकवा! आग्रह मोडता आला नाही, अपघातात तीन लेकींना गमावलं; हृदयविकाराच्या धक्क्यानं वडिलांचं निधन

Diabetes Check Mistakes: ब्लड शुगर चेक करताना होणाऱ्या 'या' चुकांमुळे वाढते डायबिटिजचे धोके

US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

SCROLL FOR NEXT