chhagan bhujbal
chhagan bhujbal esakal
नाशिक

'त्या' शिक्षणाधिकारीच्या निलंबनापूर्वी शिक्षकांचे वेतन द्या

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी (education officer) डॉ. वैशाली वीर-झनकर (vaishali veer zankar) यांना लाच घेताना अटक झाल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांचे (teachers salary) वेतन रखडले आहे. झनकर यांच्या निलंबनाचे आदेश द्या; पण आधी शिक्षकांचे रखडलेले वेतन त्वरित द्या, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. याबाबत त्यांनी बनसोड यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी वस्तुस्थिती नमूद करत शासनाकडून उत्तर आल्यानंतरच निलंबन होणार असल्याचे स्पष्ट केले.

अर्जाची सोमवारी सुनावणी

लाचप्रकरणात पोलिसांना गुंगारा देऊन अडचणीत सापडलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे. नियमित जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा दोन दिवस म्हणजेच, सोमवार (ता. २३)पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने गेल्या बुधवारी (ता. १८) झनकर यांचे साथीदार शिक्षक पंकज दशपुते व चालक ज्ञानेश्‍वर येवले यांना जामीन मंजूर केला असून, त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. झनकर यांनी अटकेपूर्वी पोलिसांना गुंगारा दिला होता, तसेच उपचाराच्या नावाखाली बहुतांश काळ जिल्हा रुग्णालयात गेल्याची दखल घेत न्यायालयाने रुग्णालय प्रशासनास नोटीस बजावली आहे. यादरम्यान नियमित जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. २०) सुनावणी होणार होती; परंतु ही सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे झनकर यांना आणखी दोन दिवस जामिनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बऱ्याच दिवसांनंतर कोरोनाबाधितांची संख्या हजारांपेक्षा कमी

बऱ्याच दिवसांनंतर कोरोनाबाधितांची संख्या हजारांपेक्षा कमी झाल्याने दिलासादायक स्थिती आहे. ही संख्या आणखी कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत (ता.२१) ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT