MHT-CET Exam Latest News
MHT-CET Exam Latest News esakal
नाशिक

MHT-CET Exam : ‘पीसीएम’ ग्रुपचे प्रवेशपत्र उपलब्‍ध; एमएचटी-सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा

MHT-CET Exam : इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, बी.एस्सी (कृषी) अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी होत असलेल्‍या एमएचटी-सीईटी परीक्षेला मंगळवार (ता. ९) पासून सुरवात होत आहे.

पहिल्‍या टप्यांत भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) ग्रुपची परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिलेले आहेत. (PCM Group Admit Card Available MHT CET exam starts from Tuesday nashik news)

सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी परीक्षेचे आयोजन केले जाते आहे. याअंतर्गत सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट होत असलेल्या एमएचटी -सीईटी परीक्षेला सुरवात होत आहे. विद्यार्थी संख्या अधिक असल्‍याने दोन टप्‍यांमध्ये ग्रुपनिहाय ही परीक्षा पार पडणार आहे.

यामध्ये पहिल्‍या टप्यांत भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची परीक्षा मंगळवार (ता.९) पासून १३ मे दरम्‍यान होणार आहे. पुढील टप्यांत भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) ग्रुपची परीक्षा १५ ते २० मेदरम्‍यान घेतली जाणार आहे.

अवघ्या चार दिवसांवर परीक्षा येऊन ठेपलेली असल्‍याने विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्‍या तयारीची लगबग सुरू होती. सीईटी सेलतर्फे पीसीएम ग्रुपच्‍या परीक्षार्थींसाठी प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिलेले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विद्यार्थ्यांना त्‍यांचा अर्जक्रमांक आणि इतर वैयक्‍तिक माहिती दाखल करून प्रवेशपत्र प्राप्त करून घेता येणार आहे. दरम्‍यान विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशपत्रावर त्‍यांच्‍या परीक्षेची दिनांक, वेळ आणि परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता असा सविस्‍तर तपशील नमूद केलेला आहे.

त्‍यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहण्याचे आवाहन सीईटी सेलतर्फे केले आहे. दोन्‍ही टप्‍यांतील परीक्षा पूर्ण झाल्‍यानंतर पर्सेंटाईल पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे.

त्‍यानंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमांच्या पदवीच्‍या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT