RTO Action esakal
नाशिक

Nashik News: स्मार्ट रोड, एमजी रोडवर वाहनांवर दंडाचा बडगा; वाहतूक शाखेची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कोट्यवधींचा खर्च करून साकारण्यात आलेला स्मार्ट रोड रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेला आहे. त्याचप्रमाणे, एमजी रोडवरील व्यावसायिकांच्या वाहन पार्किंगमुळे नित्याची कोंडी होते.

यावर बुधवारी (ता.२) वाहतूक शाखेचे सहायक आयुक्तांनीच रस्त्यावर उतरत थेट ऑनलाईन ई-चलानद्वारे दंडाचा बडगा उगारल्याने नेहमी वाहतूक कोंडीने त्रस्त असणार्यांनी समाधान व्यक्त केले.

परंतु, एमजी रोडवरील व्यावसायिकांनी मात्र पोलिसांच्या या कारवाईविरोधात निषेध नोंदवित ‘बंद’ची हाक देत दबावतंत्रांचा वापर केला. (Penalties for vehicles on Smart Road MG Road Strike action of transport department Nashik News)

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या दरम्यान कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट रोड साकारला. रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅक आहेत. परंतु या ट्रॅकवरच चारचाकी वाहने पार्क केल्या जातात. तर पादचार्यांसाठी असलेल्या फुटपाथवर दुचाक्या पार्क केल्या जातात.

त्यामुळे पादचारी रस्त्यावर चालावे लागते. या अनधिकृत पार्किंगमुळे रहदारीसाठी रस्ता अरुंद होतो. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या या स्माट रोडवर नवीन राहिलेली नाही. अशीच समस्या एम.जी. रोडवर असते.

व्यावसायिक त्यांची चारचाकी वाहने दुकानांसमोर पार्क करतात. त्यामुळे ग्राहकांना रस्त्यालगत वाहने पार्क करावी लागतात. त्यामुळे या रोडवरही वाहतूक कोंडीची नित्याची झाली आहे.

बुधवारी (ता. २) सकाळी शहर पोलीस वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सचिन बारी यांनी स्वत: रस्त्यावर उतरत सीबीएस चौक ते अशोकस्तंभ आणि एमजी रोडवरील अनधिकृतरित्या पार्क केलेल्या वाहनांविरोधात थेट इ-चलानद्वारे दंडात्मक कारवाई सुरू केली.

त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच पळापळ झाली. काहींनी वाहने काढणे पसंत केले परंतु काही चालक हे वाहने पार्क करून गेलेले होते. अशा वाहनांवर इ-चलानद्वारे दंड आकारण्यात आला.

पोलिसांच्या या कारवाईमुळे स्मार्ट रोड वाहतुकीसाठी मोकळा झाला. यावेळी बसथांब्यावर असलेल्या प्रवाशांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतूक करीत समाधान व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

व्यापार्यांमध्ये असंतोष

दरम्यान, एमजी रोडवरही अनधिकृतरित्या पार्क केलेल्या वाहनांवर इ-चलानद्वारे दंडाची कारवाई सुरू होताच येथील व्यावसायिकांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविला. तसेच, दुकाने बंद करीत पोलिसांवर दबावतंत्राचा वापर सुरू केला.

पोलिस अधिकार्यांनी व्यापार्यांना पार्किंगबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, व्यापार्यांनी मुजोरी करीत पोलिसांशी हुज्जत घालत दुकाने बंद करण्यास सुरवात केली. यासंदर्भात व्यापार्यांकडून निवेदन दिले जाणार आहे.

"स्मार्ट रोड म्हणता आणि दुतर्फा कार पार्क केल्या जातात. वाहतूक खोळंबते. एमजी रोडवर पार्किंगसाठी जागा नसते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन मनस्तापाला सामोरे जावे लागते. पोलिसांची कारवाई योग्य असून, अशी कारवाई नियमित केली तर शिस्त लागेल."

- सोमनाथ दहे, त्रस्त नागरिक.

"दररोज दुकान उघडण्यापूर्वीच समोरच कार पार्क करून जातात. पार्क करणारा एकतर कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालयात आलेला असतो. दिवसभर कार अनधिकृतरित्या पार्क केलेली असल्याने त्याचा आम्हाला त्रास होतो. पोलिसांनी नियमित अशीच कारवाई केली तर रस्त्यावरची कोंडी सुटेल आणि वाहनचालकांना शिस्त लागेल. " - एक मेडिकल व्यावसायिक.

"एमजी रोडवर पार्किंगसाठी पट्टे आखले असून, त्याबाहेरील वाहनांवर दंडाची कारवाई केली गेली. त्यास व्यापार्यांनी विरोध केला. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार."

- सचिन बारी, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT