No Cash in ATM file Photo
No Cash in ATM file Photo esakal
नाशिक

Nashik News : हक्काच्या पैशासाठी पेन्शनर हैराण; ATM पैशाअभावी कोरडेठाक!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम केंद्रात पैसे भरण्याची कामे आता काही बँकांनी ठेकेदाराकडून करून घ्यायला सुरवात केली आहे.

पैसे भरण्याची कामे मिळालेली माणसे अनेकदा दिरंगाई करीत असल्याने दोन, दोन दिवस एटीएम पैशाअभावी कोरडेठाक पडतात. परिणामी, खातेदारांना स्वतःच्या हक्कांचे पैसे मिळण्यात अडचणी येतात. (Pensioner worried about rightful money ATM not useful for lack of money Nashik News)

बँकांच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्याची सोय झाल्यापासून अनेक खातेदारांनी बँकेत जाण्याचे जवळजवळ बंद झाले आहे. सोयीनुसार रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या एटीएम केंद्रातून खातेधारक पैसे काढतात.

काही वर्षापासून सामान्यांच्या सरावाची झालेल्‍या या व्यवस्थेत आता ठेकेदारी सुरू झाली आहे. मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांकडून शहरातील एटीएम केंद्रात रोख रकमेचा भरणा करण्याची कामे खासगी ठेकेदारांना दिली आहे.

वरिष्ठ स्तरावरून पैसे भरण्याचा ठेका मिळाल्यानंतर ठेकेदाराने नेमलेल्या कर्मचाऱ्याची मनमानी सुरु होते. त्यात पैसे नाही म्हणून, खातेदार, पेन्शनरांसह सामान्य नागरिकांना तिष्ठत मनस्तापाला सामोरे जावे लागते.

द्वारका परिसरातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम केंद्रात आठवड्यापासून हा प्रकार नित्याचा झाला आहे. सलग दोन तीन दिवसांपासून एटीएममध्ये पैसे मिळत नसलेल्या काही पेन्शनरांसह महिलांनी बँकेत संपर्क साधूनही त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

ठेकेदारांचे लोकच येत नाही. आम्ही काय करावे, अशा प्रकारची हतबलता बँकेतील कर्मचारी- अधिकारी व्यक्त करीत असल्याचे अनुभव नागरिकांनी सांगितले. कुटुंबातील पेन्शन काढण्यासाठी असा अनुभव अनेकांना आला आहे

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

"एटीएममध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरावे की ठेकेदारांनी हा त्यांचा विषय आहे. मात्र सामान्यांना पैसे मिळत नाही. तक्रारी केल्या तरी, बँकेच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही."- संजय कट्यारे

तक्रारीअभावी दंडही नाही

बँकेच्या या कामकाजातील बदलांबाबत अनेकदा नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याचे पुढे येते. वारंवार एटीएममध्ये पैसे भरण्यास दिरंगाई होत असल्यास संबंधित ठेकेदार कंपन्यांवर कारवाईचा नियम आहे.

मात्र त्याबाबत ग्राहकांना माहिती नाही. एटीएममध्ये पैसे नसल्यास तक्रार कुठे करावी, याचे साधे फलकही नाही. त्यामुळे सध्या ग्राहकांची परवड सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT