Corona restrictions 
नाशिक

नाशिक शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी साकडे

कोरोना निर्बंध शिथिलीकरणासाठी पत्रव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना पहिल्या ते तिसऱ्या लाटेपर्यंतच्या प्रवासाने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघालेल्या शहरवासीयांना निर्बंधापासून दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शासनाला साकडे घातले जाणार आहे. त्यासाठी कोरोना रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्णांची वस्तुस्थिती दर्शविणारी आकडेवारी सादर केली जाणार आहे. शहरात कोरोना प्रतिबंधक पहिला डोस घेणारे ७४ टक्के नागरिक आहे. परंतु, ग्रामीण भागातील लसीकरणाची गती मंदावलेली असल्याने शहरात कोरोना निर्बंध शिथिल होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली जाणार आहे.

कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेचा महापालिकेला जोरदार फटका सहन करावा लागला. दुसऱ्या लाटेने वैद्यकीय व्यवस्थेच्या त्रुटी दाखविल्याने तिसऱ्या लाटेत कमतरता भासू नये म्हणून प्रशासनाने वैद्यकीय व्यवस्था भक्कम केली. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमध्ये एकूण १९ लाख ५२ हजार ७४५ संशयित रूग्ण आढळले. त्यातील दोन लाख ७२ हजार ७०० रुग्ण बाधित आढळले. बाधितांपैकी चार हजार १०५ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरवात झाली. जानेवारी महिन्यात तिसरी लाट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने कोरोना उतरणीला लागला.

२३ जानेवारीला दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. सक्रिय रुग्णसंख्या १०,९४८ पर्यंत पोचली होती, तर पॉझिटिव्हिटीचा दर ३९ टक्क्यांपर्यंत होता. परंतु, आता हाच दर घटला असून, सध्या शहरात १०० ॲक्टिव्ह रुग्णांची नोंदणी आहे. शहरातून कोरोना जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते, त्यापैकी १२ लाख ९८ हजार १८० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचे प्रमाण टक्केवारीमध्ये ९५ टक्के आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या दहा लाख १४ हजार ३७५ आहे. त्यामुळे शहरात कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल होणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागात लसीकरण संथगतीने सुरू असल्याने त्याचा परिणाम निर्बंध शिथिलीकरणावर होत आहे.

शहरात लसीकरणाचा टप्पा गाठण्यात आला आहे व रुग्णांची संख्यादेखील शंभरच्या आत आल्याने कोरोना निर्बंध शिथिल करावे यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

हुसेनमध्ये एक, बिटकोत चार रुग्ण

कोरोना पार्श्‍वभूमीवर महापालिकेने कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय व नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय कोव्हिड म्हणून घोषित केले होते. नवीन बिटको रुग्णालय उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे रुग्णालय ठरले होते. हुसेन रुग्णालयात सध्या एक, तर बिटको रुग्णालयात चार कोव्हिड रुग्ण उपचार घेत आहेत. कोव्हिड प्रादुर्भावापासून सर्वात कमी रुग्ण संख्या आतापर्यंतची ठरली आहे. कोव्हिड संसर्ग झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेच्या तीस प्राथमिक आरोग्य केंद्राव्यतिरिक्त अन्य चार असे ३४ लसीकरण केंद्रे सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT