Marriage  
नाशिक

Nashik News: लग्नाला यायचं हं... निमंत्रण सोशल मीडियावर; परंपरा पडू लागल्या मागे

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

Nashik News: लग्नसराई सुरू झाली असून, काळानुरूप अनेक प्रथा, परंपरा मागे पडू लागल्या आहेत. लग्नाच्या निमंत्रणपत्रिका आता सोशल मीडियावरून पाठविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. तामुळे लग्नपत्रिका छापून त्या पै-पाहुण्यांपर्यंत पोचविण्या त्रास कमी झाला असून, खर्च, वेळेची बचत होत आहे.

धूमधडाक्यात होणाऱ्या लग्नसमारंभाचा महत्त्वाचा एक भाग म्हणजे लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटप करणे. त्यासाठी खूप धावपळ करावी लागत असे. काही वर्षांपूर्वी मुला-मुलींचे वडील लग्नपत्रिका नातेवाईक, स्नेहीजनांना देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जात होते. (people sending wedding Invitation on social media nashik news)

आपुलकीने निमंत्रणपत्रिका देऊन लग्नाला यायचं बरं का? सांगत होते. निमंत्रणपत्रिका वाटताना होणाऱ्या प्रवासात अनेकदा अपघातासारख्या घटनांचे गालबोट लागत असतं. आजही ही पद्धत काहीअंशी सुरू असली, तरी गतिमान झालेल्या जगात त्याचे माध्यम नक्कीच बदले आहे.

कोरोना काळात प्रवास आणि संचारबंदी होती. त्यावेळी सोशल मीडियाचा वापर वाढला होता. आता कोरोना जाऊन बराच कालावधी लोटला, तरी या सवयी कायम राहिल्या आहेत. लग्नासह बारशाचे निमंत्रणही आता व्हॅट्‌सॲपवर दिले जाऊ लागले आहे.

लग्नपत्रिका पै-पाहुण्यांपर्यंत पोचविण्याचा अट्टाहास कमी झाला आहे. फेसबुक, व्हॅट्सॲपचा ग्रुप करून घरातील लग्नाची निमंत्रणे सहकारी, मित्रांना, नातेवाइकांना घरबसल्या पाठविण्याचे काम काही मिनिटांत होऊ लागले आहे.

इंटरनेटमुळे जग अगदी जवळ आले असून, जागतिक पातळीवरील अनेक घडामोडी सहज क्षणार्धात अगदी खेडोपाड्यात पोचत आहेत. सध्या फेसबुक, ट्विटर, मॅसेंजर, व्हॅट्सॲपमुळे त्वरित संपर्क होत आहे. मात्र, परंपरेनिमित्त एकत्र येणारी मने मात्र दुरावली आहेत. वास्तवापेक्षा आभासी दुनियेत ती जास्त रमू लागली आहेत. त्यामुळे संस्कार आणि परंपरांमधील बाज हरवू लागला आहे.

"एक काळात प्रचंड मागणी असलेल्या प्रिंटिंग व्यवसायावर सोशल मीडियामुळे गंडांतर आले असून, क्वचित लोक पत्रिका छापत आहेत. स्वाभाविक खर्च करणे परवडत नाही." -बाळासाहेब घुमरे, वज्रेश्वरी प्रिंटर्स, चांदोरी

"घरातील सुख दुःखाच्या कार्यक्रमप्रसंगी सोशल मीडिया पोस्ट करण्यासाठी मेजेसला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विविध प्रकारच्या मेजेस, व्हिडिओची मागणी वाढली आहे." -सूरज आहेर, माऊली ग्राफिक्स, चांदोरी

"शुभविवाह, वर्षश्राद्ध व इतर कार्यक्रमांच्या पत्रिका छापायच्या नाहीत, असा निर्णय चाटोरी ग्रामंपचायतीने घेतला आहे." -बाळासाहेब हिरे, उपसरपंच, चाटोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT