नाशिक

लोकांना विचारून निर्णय घ्या, म्हणणारे अण्णा हजारे शेतकऱ्यांसोबत

कैलास भोसले : ८८ कोटी मद्यविक्रीची तुलना वाइनसोबत करणे अयोग्य

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वाइन विक्रीबद्दल लोकांना विचारून निर्णय घ्या, असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही रविवारी (ता. १३) दिली. राळेगणसिद्धी येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह सांगली, सोलापूर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी श्री. हजारे यांची भेट घेतली. वाइन व्यवसाय द्राक्षशेतीशी जोडला गेला असल्याने शेतीविरोधात भूमिका घेऊ नये, अशी विनंती त्यांना करण्यात आल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.

राज्य सरकारने वाइन सुपर मार्केट, मॉलमध्ये विक्रीसंबंधी काही नियम घालून परवानगी दिली आहे. त्याचे संघाने समर्थन केले आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, की राज्यात दर वर्षी देशी मद्य ३६ कोटी लिटर, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य २२ कोटी लिटर, बिअर ३० कोटी लिटर अशी एकूण ८८ कोटी लिटरची विक्री होते. वाइनची विक्री मात्र ७५ लाख लिटर इतकी आहे. शिवाय देशी मद्य ४० ते ५० रुपयांना आणि वाइन ४०० ते ५०० रुपयांना विकत मिळत असल्याने देशी मद्यपी हे वाइन विकत घेऊ शकत नाहीत. त्याचवेळी मर्यादित व नियमित वाइन सेवनचे आरोग्यदायी असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. त्यामुळे मद्याची आणि वाइनची तुलना अयोग्य आहे. वाइन उत्पादन द्राक्षांपासून प्रक्रिया करून होते. केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगांसाठी सबसिडी देते. या साऱ्या बाबींचे निवेदन श्री. हजारे यांना संघातर्फे देण्यात आले. याशिवाय श्री. हजारे यांनी ९० दिवसांचा दिलेला वेळ स्वागतार्ह आहे.

राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन

संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, माजी अध्यक्ष रवींद्र बोराडे, रावसाहेब रायते, विजय घुमरे, राजेंद्र सोनवणे, शेखर होळकर उपस्थित होते. वाइन विक्रीबाबत शेतकरी आग्रही आहे.

त्याअनुषंगाने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला गेल्यास द्राक्ष उत्पादक राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करतील, असा इशारा श्री. भोसले यांनी दिला. श्री. भोसले म्हणाले, की जगामध्ये इसवी सन पूर्व सहा हजारपासून इटली, फ्रान्स, अमेरिका, अर्जेंटिना वाइन उत्पादनात अग्रेसर आहे. वाइन ‘फर्मेन्टेशन’ने तयार होत असल्याने फळाचे पोषणमूल्य आणि औषधी गुण टिकून राहतात. त्यामुळे वाइन हे अन्न आणि औषधी आहे. रेड वाइनमुळे पचनशक्ती मजबूत होते. पोटातील बॅक्टेरियाचा नायनाट होतो. पोटातील अल्सर कमी होण्यास मदत होते. रेड वाइन रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवर गुणकारी आहे. वाइन पाक प्रक्रियेत आणि स्वयंपाकात चवीसाठी वापरली जाते असे अनेक फायदे सांगता येतील.

वाइन उद्योग पाच हजार कोटींवर नेण्याचा मानस

देशात फळांवर दहा टक्क्यांच्या आत प्रक्रिया होते. परदेशात हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आहे. राज्य सरकारच्या वाइन विक्रीच्या धोरणामुळे शेतमालाचे मूल्यवर्धन होऊन ग्रामविकासाला चालना मिळेल. रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला मदत होईल. देशातील वाइन उद्योग एक हजार कोटींवरून पाच हजार कोटींपर्यंत नेण्याचा मानस आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, की गोवा आणि मध्य प्रदेशात बेरी फळाच्या वाइन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मागेल त्याला होमडिलिव्हरी’ सेवा दिली जात आहे. ही सारी परिस्थिती पाहता, महाराष्ट्र मद्यराष्ट्र होईल, असा आरोप करणे चुकीचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT