Crowd in nashik esakal
नाशिक

Corona त्रिसूत्रीला नागरिकांनी दाखवली केराची टोपली

युनूस शेख

जुने नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात शहरात कोरोना (Corona) रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे, नागरिकांना मात्र त्याचे गांभीर्य नाही. कोरोना संदर्भातील प्रशासनाकडून घालून दिलेल्या सूचना नियमांचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहे.

नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कोरोना रुग्णांची संख्या सध्या तरी कमी आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत होणारी वाढ बघता शहरातील ही रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुन्हा गेल्यावर्षी सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी बाजारात वावरत असताना मास्क वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, मात्र तसे केले जात नाही. बहुतांशी नागरिक विनामास्क बाजारपेठेत विविध प्रकारच्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे.

नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी

प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत ठिकठिकाणी गर्दी केली जात आहे. सॅनिटायझरचा वापर करणे तर दूरच, अशा प्रकारची परिस्थिती सध्या सर्वत्र दिसत आहे. अशी परिस्थिती कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास पोषक ठरत आहे. नागरिकांनी काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करावे. त्याच प्रमाणे महापालिका प्रशासनाने देखील वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये जनजागृती करावी. गर्दीच्या ठिकाणी कारवाई करावी. मास्क वापर सक्तीचा करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी होत आहे.

‘नो मास्क, नो एन्ट्रीचा’ विसर

महापालिकेकडून सक्ती करण्यात आल्यानंतर शासकीय कार्यालय दुकानांमध्ये प्रवेशद्वारावर ती नो मास्क नो एन्ट्रीचे फलक झळकले होते. त्याचा बहुतांशी प्रमाणात परिणामदेखील जाणवला होता. परंतु, प्रशासनाने थोडी शिथीलता देताच बाजारपेठेतील दुकानदाराने आणि शासकीय कार्यालयीन प्रमुखांना ‘नो मास्क नो एन्ट्री’ फलकांचा विसर पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT