Officials of MVIPR Institute welcoming student Perada Pumkhachoran from Thailand. esakal
नाशिक

Nashik News: थायलंडची पेराडा शिकण्यासाठी आली नाशिकला

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : थायलंड देशातील पेराडा पुमखाचोरन हिने शिक्षणासाठी नाशिक गाठले आहे. तिने केटीएचएम महाविद्यालयात इयत्ता अकरावीला प्रवेश घेतला आहे.

एएफएस इंटर कल्चरल प्रोग्रॅमअंतर्गत ती नाशिकला आली असून, वर्षभर योगिता आणि शिवाजी शिंदे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहे. (Perada from Thailand came to Nashik to study News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एएफएस या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून आंतरसांस्कृतिक शिक्षणाच्या संधी प्रदान करते. याअंतर्गत दरवर्षी विविध देशांतून विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत असतात. येथे शिक्षण घेताना स्‍थानिक कुटुंबात सदस्‍याप्रमाणे राहात असतात.

नुकताच थायलंड येथून पेराडा आलेली आहे. तिचे स्‍वागत मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, केटीएचएमचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, प्रा. बी. डी. पाटील, प्रा. दौलत जाधव यांनी केले.

डीलीजंट बॅचचे समन्वयक डॉ. कैलास शिंदे, प्रा. जी. एस. खुळे एएफएसचे अध्यक्ष प्रमोद कांगुणे, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, समन्वयक जीवन शिंदे, स्वयंसेवक शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT