NMC Nashik News
NMC Nashik News esakal
नाशिक

NMC Recruitment : नोकर भरतीला कायमस्वरूपी ‘ब्रेक’? 134 पदांबाबत राज्य शासनाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

NMC Recruitment : राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळून जवळपास १४ हजार पदे भरण्याची सुशिक्षित बेरोजगार वाट पाहत असताना राज्य शासनाने जवळपास १३४ पदांबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्याय निवडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे महापालिकेच्या नोकर भरतीला या निमित्ताने ब्रेक लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. (permanent break on job NMC Recruitment Decision of State Government regarding 134 posts nashik news)

नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यानंतर जवळपास सात हजार ९२ पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला होता. त्यातील आता जवळपास २८०० पदे रिक्त आहे. तर उर्वरित पदे भरण्यासाठी शासनाकडे महापालिकेने मागणी नोंदवली आहे.

परंतु महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या आत आल्यावरच नोकर भरती करता येणार आहे. दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने नवीन आकृतिबंध मंजुरीसाठी शासनाकडे प्रलंबित आहे.

त्यात जवळपास १४ हजार पदांचा समावेश आहे. कोरोनाकाळात राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदे भरण्यास मंजुरी दिली. त्याअनुषंगाने जवळपास ७०८ पदांसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस माध्यमातून भरती करण्याचे नियोजन केले जात आहे.

नाशिक महापालिकेत वर्ष अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात नोकर भरती होईल. या आशेवर सुशिक्षित बेरोजगार असतानाच राज्य शासनाने १४ मार्चला नव्याने आदेश काढून जवळपास १३४ पदासंदर्भात पर्याय निवडण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना केल्या आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

कुशल, अकुशल, अर्ध कुशल, अतिकुशल या चार प्रकारच्या मनुष्यबळासाठी ९ एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीच्या माध्यमातून १३४ प्रकारची पदे भरली जाते. याचाच अर्थ शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थावरचा खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाह्य यंत्रणेमार्फत काम करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आउटसोर्सिंग माध्यमातून पदे भरणार

जवळपास १३४ पदांचा समावेश आहे. त्यापैकी प्रकल्प अधिकारी, प्रकल्प समन्वयक, ट्रेनिंग मॅनेजर, फंक्शनल कन्सल्टंट, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, विपणन विशेषज्ञ, समुपदेशक, जिल्हा समुपदेशक, तंत्रज्ञ, जनसंपर्क अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान विशेषज्ञ, हार्डवेअर इंजिनिअर,

सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, आयटी प्रोजेक्ट ऑफिसर, ग्राफिक डिझायनर, कंटेंट रायटर, प्रोजेक्ट डायरेक्ट, अकाउंट ऑफिसर, इस्टेट मॅनेजर, अकाउंटंट, स्टेनोग्राफर, स्टोअर कीपर, ट्रॅफिक वॉर्डन, हाऊस कीपर, स्टोअर मॅनेजर, स्वच्छता कर्मचारी, मदतनीस, शिपाई, मजूर आदी पदांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT