NDCC Bank esakal
नाशिक

नाशिक : जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांना कर्ज वाटप परवानगी

कुणाल संत

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून अनिष्ट तफावतीत असलेल्या जिल्ह्यातील ४३५ विविध कार्यकारी सोसायट्यांना पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आदेशाने जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी (Loan) परवानगी दिली आहे. (Permission to disburse loans to societies with undesirable differences in district Nashik News)

नाशिक जिल्हा सहकारी बँकेतर्फे (NDCC Bank) जिल्ह्यातील ४३५ सहकारी सोसायट्यांना (Cooperative societies) शेतकऱ्यांना पीककर्ज (Crop Loan) देण्यासाठी बंदी घातली होती. तसेच कर्जासाठी आवश्यक असलेला निधीही बँकेकडून बंद करण्यात आला होता.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी या सहकारी सोसायटीकडून होत होती. याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँक प्रशासक व प्रशासकीय संचालकांची एकत्रित बैठक घेऊन या संस्थांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा बँकेने परिपत्रक काढले असून, जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांना सभासदांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येवल्यातील २३ सोसाट्यांचा समावेश

जिल्ह्यात एकूण ४३५ अनिष्ट तफावतीतील संस्था असून, यात येवल्यातील एकूण २३ संस्थांचा समावेश आहे. या संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत जिल्हा बँकेने अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांना कर्जपुरवठा न करण्याच्या निर्णय मागे घेऊन नियमित करण्याची मागणी केली होती. जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर गेल्या आठवड्यात सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन कर्जपुरवठा नियमित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले असून, अटी शर्थींची पूर्तता करून सभासदांना कर्जवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या आहेत अटी व शर्ती

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत काढलेल्या परिपत्रकात काही अटी-शर्थी बंधनकारक केल्या आहेत. यात २०२२-२३ हंगामात ३१ मार्च २०२२ अखेरीस असलेल्या अनिष्ट तफावतीच्या रकमेपैकी ३० सप्टेंबर २०२२ अखेर किमान २५ टक्के व ३१ मार्च २०२३ अखेर किमान ५० टक्के अनिष्ट तफावतीतील रक्कम कमी करण्याचे संस्थेवर बंधनकारक राहील. ३१ मार्च २०२२ अखेरीस असलेल्या अनिष्ट तफावतीच्या रकमेत यापुढे वाढ होणार नाही, याची दक्षता घेऊन कामकाज करावे व बँकेने सुचित केल्यानुसार कर्जखाती व्यवहार करावेत. अनिष्ट तफावतीतील पात्र सभासदांनाच पीककर्ज वितरण करावे.

संस्था चालू हंगामात जेवढी रक्कम सभासदास पीककर्ज वाटप करील, अशा सर्व सभासदांची संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली मुदतीत करून शाखेत रोखीने भरणे संस्थेवर बंधनकारक आहे. थकबाकीदार सभासदांकडील पीक कर्जाची प्राधान्याने वसुली करून या सभासदांना नव्याने कर्ज वितरण करावे यांसह सर्व सूचनांचे पालन करणे सोसायट्यांना बंधनकारक आहे. असे परिपत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT