pharmaceutical factories Google
नाशिक

औषध निर्मिती कारखान्यांमध्ये आठऐवजी १२ तास कामाला परवानगी

सतिश निकुंभ

कोरोनामुळे दीड वर्षांपासून औषध निर्मिती उद्योगांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. या उद्योगांनी उत्पादन क्षमतादेखील वाढविली असून, वाढीव मनुष्यबळाची गरज भासत आहे.

सातपूर (नाशिक) : कोरोनाकाळात हजारो परप्रांतीय कामगार गावी गेल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची कमतरता भासत आहे. यामुळे आठऐवजी १२ तास काम करण्यास परवानगी देण्याची फार्मास्युटिकल उद्योगांची मागणी शासनाने मान्य केली आहे. मात्र, ही परवानगी देताना शासनाने काही अटी-शर्ती लागू केल्या आहेत. (permission to work 12 hours instead of eight in pharmaceutical factories nashik news)

कोरोनामुळे दीड वर्षांपासून औषध निर्मिती उद्योगांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. या उद्योगांनी उत्पादन क्षमतादेखील वाढविली असून, वाढीव मनुष्यबळाची गरज भासत आहे. यामुळे औषधनिर्मिती कारखान्यांमध्ये आहे त्या कामगारांना अधिक तास काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सने शासनाकडे केली होती. शासनाने सकारात्मक विचार करून १२ तास काम करण्याची परवानगी दिली. कमतरता भासत असेल, अशाच कारखान्यांना उपलब्ध कामगारांकडून १२ तासांच्या दोन पाळ्यांमध्ये कारखाना चालविण्याची परवानगी दिली आहे. नाशिकमधील सहा मोठ्या फार्मास्युटिकल उद्योगांना उत्पादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. शासनाने निर्धारित केलेल्या नियमावलीत प्रमुख्याने जादा सेवा देणाऱ्या कामगारांचे कामाचे वेतन हे साधारण वेतनाच्या दुप्पट दराने दिले पाहिजे, वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक प्रक्रियेचा, कामगारांच्या सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची जबाबदारी भोगवटादाराची राहील, कामाचे तास १२ तासांपेक्षा जास्त नसावेत, कोणत्याही आठवड्यात एकूण कामाचे तास ६० तासांपेक्षा अधिक असू नये, कोणत्याही कामगारास सलग सात दिवस काम देऊ नये, तसेच कोणत्याही तिमाहीत कामांचे तास हे ११५ तासांपेक्षा जास्त असू नयेत, अशा अटींसह शासनाने परवानगी दिली आहे.

कोरोनासह आपत्तीकाळात कामगारांनी शासनाला व औद्योगिक क्षेत्राला मोठ योगदान दिले आहे. परंतु, कंपन्या व्यवस्थापन याचा गैरफायदा घेऊन कामगारांची गळचेपी करणार नाही याकडे ही लक्ष देण्याची गरज आहे.

- डॉ. डी. एल. कराड, कामगार नेते

(permission to work 12 hours instead of eight in pharmaceutical factories nashik news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT