Permission will be required again to celebrate the festival corona restriction nashik esakal
नाशिक

सण-उत्सव साजरे करण्यासाठी आता पुन्‍हा लागणार परवानगी

पोलिस आयुक्तांकडून २० एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सण-उत्‍सव साजरे करण्यासाठी पोलिसांची घ्यावी लागणारी परवानगी काही दिवसांपूर्वीच वादाचा मुद्दा ठरली होती. अशात राज्‍य शासनाने निर्बंध शिथिल करताना मोठ्या उत्‍साहाने सण-उत्‍सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, नाशिककरांसाठी हा आनंद औटघटकेचा ठरला आहे. बुधवारी (ता. ६) पोलिस आयुक्‍त दीपक पांडे यांनी प्रतिबंधात्‍मक आदेश जारी केले आहेत.

२० एप्रिलपर्यंत पोलिस आयुक्‍तालय हद्दीत हे आदेश लागू राहणार असल्‍याने या दरम्‍यान येणाऱ्या सण- उत्सवाकरिता पुन्‍हा पोलिसांची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात कोरोनाचे निर्बंध पूर्ण शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना सण, उत्सव जल्लोषात साजरा करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, सध्या मुस्लीम बांधवांचा सुरू असलेला पवित्र रमजान महिना, तसेच पुढील काही दिवसांवर आलेले रामनवमी, रामरथ व गरुडरथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे आणि हनुमान जयंती उत्सवानिमित्त या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्त यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करत शहरामध्ये २० एप्रिल २०२२ या काळात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहे. त्यामुळे शहरात पोलिस आयुक्तांच्या परवानगी शिवाय पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येवू शकणार नाही.

तसेच गर्दी करण्यास, जमाव करण्यास मिरवणूक काढण्यास आणि सभा घेण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वरील सण, उत्सव साजरे करण्यापूर्वी सर्वांना पोलिस आयुक्तालयाची परवानगी घेणे आता बंधनकारक ठरणार आहे. जर या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित हा शिक्षेस पात्र ठरणार आहे.

पुढील १५ दिवसांमधील सण मुस्लिम बांधवांचा सुरू असलेला पवित्र रमजान महिना

  • १० एप्रिल श्रीरामनवमी

  • १२ एप्रिल रामरथ व गरुडरथ

  • १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

  • १५ एप्रिल गुडफ्रायडे

  • १६ एप्रिल हनुमान जयंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT