dog care esakal
नाशिक

Dog Care : सावधान... आपल्या श्वानाची काळजी घ्या अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा

Dog Care : श्वान पाळण्याची अनेकांना हौस असते. अगदी त्यासाठी अत्यंत महागड्या जातीचे श्वान खरेदी केले जातात. परंतु या श्वानाची निगा राखणे, त्यांचा सांभाळ करता येत नाही. त्यामुळे या पाळीव श्वानांचा त्रास शेजाराऱ्यांना होऊन मालकाविरुद्ध गुन्हाही दाखल होऊ शकतो.

असाच प्रकार नाशिक रोडला घडला असून, श्वान मालकांविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pet dogs can cause trouble to neighbors case can filed against owner nashik news)

केतन कांकरिया (३०, रा. जैन भवनसमोर, नाशिक रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या मालकाचे नाव आहे. प्राणीमित्र प्रतिमा भरत सोमैया (रा. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, कांकरिया यांच्याकडे लॅब्रोडोर जातीचे पाळीव श्वान आहे.

कांकरिया हे व्यावसायिक असून, कामानिमित्त ते बराच वेळ घराबाहेर राहतात. यादरम्यान त्यांनी पाळीव श्वानासाठी चार बाय सहाचे एक जाळीचे घर केले आहे. या घरातच ते श्वानाला बंद करून बाहेर जातात. मात्र दिवसभर हे श्वान एकाच ठिकाणी राहिल्याने भुंकत असते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

याबाबत आसपासच्या नागरिकांनी कांकरिया यांना श्वानाच्या भुंकण्यामुळे त्रास होत असल्याचे सांगितले होते. परंतु, कांकरिया यांनी त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी यासंदर्भात तक्रार प्राणीमित्र संघटनेकडे केली.

त्यानुसार या संघटनेकडून प्रतिमा सोमैया यांनी घटनास्थळी येऊन श्वान ताब्यात घेतले. याबाबत त्यांनी उपनगर पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक उपनिरीक्षक शिवाजी सातभाई करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT