Petrol price hike
Petrol price hike esakal
नाशिक

ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोलच्या दरात भडका

सकाळ वृत्त सेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वाढती महागाई सर्वसामान्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. खाद्यपदार्थांच्या वस्तूंपासून इंधन, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ही वाढ कायम असून, महिनभरात पेट्रोल पाच रुपये १३ पैशांनी, तर डिझेलमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. तर पॉवर पेट्रोलसाठी ११७ रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे.

जवळच्या प्रवासाला सायकल, तर लांबच्या प्रवासाला दुचाकी

यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. इंधन दराचा भडका सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे जवळच्या प्रवासाला सायकल, तर लांबच्या प्रवासाला नाइलाजाने दुचाकी वापरावी लागत आहे. महिनाभरापासून सुरू असलेली पेट्रोलची दरवाढ कायम असून, सोमवारी पिंपळगावमध्ये ११३ रुपये ३५ पैसे प्रतिलिटर दराने पेट्रोल, तर डिझेल १०२ रुपये ६६ पैसे दराने विकले जात होते. यामुळे सर्वसामान्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.


२४ दिवसांत १८ वेळा पेट्रोलवाढ

१ ऑक्टोबरला पेट्रोलचा दर १०८ रुपये २२ पैसे प्रतिलिटर होता. त्यानंतर २ ऑक्टोबरला २४ पैसे दरवाढ करण्यात आली. ३ ऑक्टोबरला ५४ पैसे, ५ ऑक्टोबरला २४ पैसे, ६ ऑक्टोबरला २९ पैसे, ७ ऑक्टोबरला २७ पैसे, ८ ऑक्टोबरला २८ पैसे, अशी रोजच सरासरी २५ ते ४० पैसे दरवाढ करण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये २४ दिवसांत १८ वेळा दर वाढले असून, वाढणारी ही किंमत लिटरमागे वाहनधारकांचा पाच रुपये १३ पैशाने खिसा खाली करत आहे.

हेच का अच्छे दिन?

नवीन दर सकाळी सहापासूनच लागू होत असतात. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डिलर कमिशन आणि इतर कर जोडल्यानंतर किंमत ठरते. दिवसागणिक होणारी दरवाढीचा पेट्रोल विक्रीवरही परिणाम झाला असून, दिवसाला एक हजार लिटरची पेट्रोल व डिझेलच्या विक्रीत घट झाली आहे.'' - सतीश देशमाने, देशमाने पेट्रोलियम, पिंपळगाव बसवंत

''रोज वाढत असलेले पेट्रोलचे दर पाहून धडकी भरत आहे. पेट्रोलचे दरवाढ अशीच होत राहिली, तर नागरिकांना दुचाकी सोडून सायकल वापरावी लागेल. महागाईतून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे हेच का अच्छे दिन.'' - राजेंद्र खोडे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पिंपळगाव बसवंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT