petrol pump esakal
नाशिक

...तर पेट्रोलपंप चालकांचा पोलिसांविरोधात बंद | Nashik

विनोद बेदरकर

नाशिक : विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला पेट्रोल दिल्यास पंपचालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांच्या विचाराधीन आहे. तसा निर्णय घेतल्यास शहरातील शनिवारी शहरात पेट्रोलपंप बंद ठेवून पोलिसांच्या निर्णयाला विरोध करणार असल्याचा इशारा जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी दिला आहे.

पेट्रोलपंप चालकांचा पोलिसांविरोधात बंद

शनिवार (ता.२) पासून दुचाकीवरील प्रवासासाठी चालकासोबत सह प्रवाशाला हेल्मेट सक्तीचे असल्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयासोबतच पंपचालकांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला पेट्रोल दिल्यास संबंधित पंपचालकांवर दुचाकीस्वाराला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शहर पोलिसांच्या विचाराधीन आहे. पोलिस आयुक्तांनी अद्याप तसा आदेश काढलेले नसले तरी त्यांच्या यासंदर्भातील वक्तव्यावरून पेट्रोलपंपाचा विरोध सुरू झाला आहे. शहर पोलिसांची पंपचालकांवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका धोकादायक असेल. कारण पेट्रोलपंपावर हेल्मेट घातलेले अनेक जण वाहन चालविताना हेल्मेट काढून ठेवतात. पेट्रोलपंपावर हेल्मेटसक्ती केल्याने रस्त्यावर हेल्मेट वापरण्यात खूप वाढ होत नाही.

दाद मागणार

उच्च न्यायालयाच्या दाखल याचिकेनुसार पोलिस आयुक्तालय कार्यालयाला यासंदर्भात सुनावणी घेण्याचे न्यायालयाचे आदेश आहे. १९ नोव्हेंबर २०२१ ला उच्च न्यायालयातील वकिलांतर्फे पेट्रोलपंप असोसिएशनने पोलिस आयुक्त कार्यालयाकडून याविषयी बोलाविण्यात आलेले नाही. हा विषय प्रलंबित असताना पुन्हा निर्णय घेणे चुकीचे आहे. याविषयी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेउन त्यांच्याकडे दाद मागणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्भवती आई अन् आठ वर्षांचा मुलगा... एका रात्रीत देशाबाहेर! न्यायालयातील थरारक क्षण, CJJ Suryakant यांचा मोदी सरकारला फक्त एक सवाल!

Solapur Crime : घरात कोणी नसताना १६ वर्षाच्या मुलीने लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने घेतला गळफास; तिने का उचललं टोकाचं पाऊल?

PMP Bus Pass : पास महागल्याने पीएमपीकडे पाठ; सहा महिन्यांत पासधारक ३२ टक्क्यांनी घटले

Kolhapur Election Update : प्रचार थांबताच कर्मचाऱ्यांची धावपळ! संपूर्ण शहरातून फलक-झेंडे हटवण्यात सरली रात्र

Solapur Crime:'एकतर्फी प्रेमातून चुलत मामेबहिणीचा खून'; तरुणास आजीवन जन्मठेप, राग अनावर झाला लग्नास नकार अन्..

SCROLL FOR NEXT