नाशिक

पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा २८ ऑक्टोबरपासून ४० विषयांसाठी ३ हजार ३४६ विद्यार्थ्यांची नोंदणी; १ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा

CD
जळगावात आजपासून पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा ३३४६ विद्यार्थ्यांची नोंदणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२७ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) २०२६ चे आयोजन २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी एकूण तीन हजार ३४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ४० विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठात पीएच.डी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित केली जाते. त्यानुसार यंदाची पेट परीक्षा विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा केंद्रात घेतली जाणार आहे. संशोधन क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. प्रवेशपत्रे लॉगिनवर उपलब्ध परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे त्यांच्या ऑनलाइन लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी आणि किती वाजता आहे, याची खात्री करून घ्यावी. परीक्षेला उपस्थित राहताना निर्धारित वेळेचे पालन करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ४० विषयांसाठी होणाऱ्या या परीक्षेच्या माध्यमातून पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT