Along with the books sent to Minister Bhujbal, Dr. Sujit Gunjal, Praveen Kadam and Pramod Patil.  
नाशिक

Chhagan Bhujbal: भुजबळांना पाठविली महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांची पुस्तके; मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांना डिवचले

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : मराठा व कुणबी, ओबीसी वादामुळे सध्या राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यात मोठ्या प्रमाणात वाकयुद्ध सुरू आहे. (Phule Dr Ambedkar books sent to Bhujbal by maratha Activists nashik news)

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री भुजबळ यांना पाठविली असून, या वीरपुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्याची मागणी केली आहे.

मराठा समाजाचे पदाधिकारी डॉ. सुजित गुंजाळ, प्रवीण कदम, प्रमोद पाटील व कार्यकर्त्यांनी एकप्रकारे भुजबळांना डिवचले आहे.

महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा मंत्री छगन भुजबळ यांना विसर पडल्याने खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजावर टीका करीत आहेत.

त्यामुळे आम्ही त्यांना पुस्तके टपालाने पाठविली आहेत. या पुस्तकांचे मंत्री भुजबळ यांनी वाचन करत महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करावे, अशी मागणी केली आहे. श्री. भुजबळ यांनी पुस्तके वाचली किंवा नाही वाचली, हे त्यांच्या भाषणातून कळेल, असे मराठा आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT