fraud esakal
नाशिक

पैश्‍यांचा पाऊस पाडण्याचे आमिष; युवतीवर वारंवार अतिप्रसंग

अरूण मलाणी

नाशिक : पैश्‍यांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत चक्क सत्तावीस वर्षीय युवतीवर वारंवार अतिप्रसंग केल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. शहराला लागून असलेल्‍या गंगापूर गाव परीसरात हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात पीडीतेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.

पूजेच्‍या बहाण्याने केला अत्याचार

पैश्‍यांचा पाऊस पाडण्यासाठी संशयितांनी पीडीतेला प्रत्‍येक बुधवारी पूजा करण्यास सांगितले. त्‍यानुसार गंगापूर गावातील पठाडे गल्‍ली येथील जामा मस्‍जीदच्‍या शेजारी असलेल्‍या पत्र्याच्‍या घरात तिला डिसेंबर २०२० च्‍या तिसऱ्या आठवड्यात बोलविण्यात आले. घटनेतील संशयित काममिल गुलाम यासिन शेख याने पैश्‍याचा पाऊस पाडण्याचे खोटे आश्‍वासन देतांना पूजेच्‍या बहाण्याने पीडीतेला निवस्‍त्र केले. खोटी पुजा मांडून ओठाने मंत्र पुटपुटत मंत्र म्‍हणून पीडीतेच्‍या अंगावरुन नारळाचा उतारा करत इच्‍छेविरुध्द शरीर संबंध प्रस्‍थापित केले. हा सर्व प्रकार पुढील तीन आठवड्यांच्‍या बुधवारी सुरु राहिला. या कृत्‍यासाठी संशयित शेखसह अन्‍य दोघे संशयित फर्नांडिस व भुजबळ यांनी मदत केल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

इच्‍छेविरुद्ध वारंवार शरीर संबंध, तिघा संशयितांना पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

पीडीतेने दिलेल्‍या फिर्यादित म्‍हटले आहे, की गेल्‍या १३ डिसेंबर २०२० पासून ९ जानेवारी २०२१ या कालावधीत संशयितांनी पैश्‍यांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवतांना इच्‍छेविरुद्ध शरीर संबंध प्रस्‍थापित केले. यासंदर्भात पीडीतेने गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, घटनेतील तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेतकामिल गुलाम यासिन शेख (वय २९, रा. लालगंज ता.दालकोटा, जि. उत्तर प्रदेश जनाजपुर, पश्‍चिम बंगाल व सध्या जामा मशीद समोर पठाडे गल्ली, गंगापूर गाव), स्‍टॅलीस्‍टींग उर्फ शिवराम जेम्‍स फर्नांडिस (वय ५६, मुळ रा. जंगारेस्‍टयुड्डू जि. पश्‍चिम गोदावरी, आंध्रप्रदेश व सध्या कमलनगर, कामठवाडा, नाशिक) व अशोक नामदेव भुजबळ (वय ६३, रा.राधाकृष्णनगर, सातपूर) असे अटक केलेल्‍या तिघा संशयितांची नावे आहेत.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Wave Warning Maharashtra : विदर्भात थंडीचा येलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज समोर, सतर्कतेचा इशारा

iPhone 15 झाला एकदम स्वस्त! 'या' ठिकाणी मिळतोय 28 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट

Latest Marathi News Update : विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

Mumbai News: मुंबईच्या जलव्यवस्थापनाला बळ! सांडपाणी वाहतुकीसाठी नव्या ‘वॉटर टनेल'ला CRZ मंजुरी; कुठून कुठे असणार मार्ग?

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, नागपूरहून गडचिरोलीला जाताना दुर्घटना

SCROLL FOR NEXT