नाशिक

पिंपळगाव बसवंत वाघ महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेत दणदणीत विजय लासलगाव महाविद्यालयाला नमवून विजेतेपद; विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड

CD
पान दोन ॲंकर ------------- 10337 पिंपळगाव बसवंत : बेसबॉल स्पर्धेत विजयी झालेला संघ. पिंपळगाव महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेत यश लासलगावच्या संघावर दणदणीत विजय; विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड सकाळ वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत, ता. १७ : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या क. का. वाघ महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन बेसबॉल संघाने जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत विजेतेपद पटकावले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि जिल्हा बेसबॉल संघटना, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, एमआयडीसी, अंबड-सातपूर, नाशिक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत क. का. वाघ महाविद्यालयाच्या संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात लासलगाव महाविद्यालयाच्या संघाचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या शानदार विजयामुळे महाविद्यालयाच्या संघाची विभागीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.पी.एम खैरनार व विनय गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघात बंटी राठोड, रोहनकुमार प्रसाद, निलेश जाधव, रोशन चव्हाण, गौरव जगताप, जीवन सुनार, राज चव्हाण, आयुष शिंदे, अजय कंक, शुभम गांगुर्डे, ओम आहेर, मानव कदम, कृष्णा विधाते आणि सोहम गांगुर्डे यांचा समावेश होता. खेळाडूंच्या यशाबद्दल विजयी खेळाडूंचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक शिवाजी गडाख, महिला संचालिका शोभा बोरस्ते, प्रा. रवींद्र मोरे, सुनील पाटील व सर्व सदस्य, संस्थेचे सभासद, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम, उपप्राचार्य दिलीप माळोदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Retire : महेंद्रसिंग धोनीने '7' चे गणित इथेही गाठले; चेपॉकवर निवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले, शेवटचा सामना कुठे व केव्हा खेळला?

यष्टिंमागचा 'योद्धा'; जो सामन्याला द्यायचा सहज कलाटणी, नाव सांगायची गरज नाही...

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Latest Marathi News Live Update : अमित शाहांवर टीका करणारे थापाडे, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

SCROLL FOR NEXT