Dilip Bankar, Anil Kadam
Dilip Bankar, Anil Kadam esakal
नाशिक

Market Committee Election : उमेदवारीसाठी आर्थिक सक्षमता हवीच! बनकर-कदम गटाकडे इच्छुकांची लॉबिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : एका बाजूला सहा सोसायट्यांचा वाद न्यायप्रविष्ट असताना दुसरीकडे मात्र आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाकडून पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

गुप्त बैठका, डावपेच आखताना आर्थिक क्षमता व व्होट बॅक ताब्यात असलेल्या इच्छुकांनाच उमेदवारी देण्याचा निकष बनकर व कदम यांनी ठेवले आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना निरखून, पारखून घेण्यात येणार असून तगडा व सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या उमेदवारांच्या शोधात सर्वांच्या नजरा भिरभिरत आहेत.

असे असले तरी अशी सक्षमता नसलेले मात्र चांगला जनसंपर्क असलेले मात्र यातून नाराज होणार असून त्याचा फटकाही या दोन्ही गटाला बसू शकतो असे बोलले जात आहे. (pimpalgaon market committee election Lobbying of aspirants to Bankar Kadam group started nashik news)

पिंपळगाव बाजार समितीची स्थापना होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. कांदा, टोमॅटोची राजधानी म्हणून जगभरात पिंपळगावची ख्याती आहे. शंभर एकरातील सुपर मार्केट व कोटीच्या ठेवी अशी श्रीमंतीची झळाळी बाजार समितीला लाभली आहे.

अशा धनाढ्य व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेल्या पिंपळगाव बाजार समितीचा कारभार हाती घेण्यासाठी बनकर व कदम गटात टोकाची स्पर्धा सुरू आहे. राजकारणात बनकर व कदम हे दोघेही तरबेज आहेत. त्याची झळक सुरू असलेल्या सहा सोसायट्यांच्या रस्सीखेचीवरून अधोरेखित होते.

न्यायालयाचा निकाल काय यायचा तो येईल पण इकडे दोन्ही गटांनी डावपेच आखताना उमेदवारी निश्‍चित करण्याचे काम सुरू केले आहे. मतदान मर्यादित असले तरी अर्थपूर्ण प्रयोगामुळे ही निवडणूक आर्थिक उलाढालीच्या सर्व सीमा ओलांडणार हे आताच दिसू लागले आहे.

आतापासून मतदारांच्या भेटीगाठी घेऊन इच्छुकांनी फिल्डींग टाईट करण्यास सुरवात केली आहे. उमेदवारी मिळावी यासाठी गावचे स्थानिक नेते बनकर व कदम गटाकडे लॉबिंग करण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

विधानसभेच्या निवडणुकीत आमची कशी मदत झाली किंवा होणार हे पटवून देताना एवढ्या मतदारांचा पाठिंबा असल्याची यादीच ठेवली जात आहे. आर्थिक सक्षम नसलो तरी निष्ठावान आहे, त्यामुळे उमेदवारी हवीच असा हट्टही काही कार्यकर्त्याकडून धरला जात आहे.

यातून नाराजीही ओढावण्याची भीती आहे. निष्ठावान कधी बंडाचा झेंडा फडकवितील याचा नेम नाही. त्यामुळे आमदार बनकर व कदम यांच्यासमोर निवडणुकीपूर्वी ते मोठे आव्हान असेल.

दोन्ही गटाच्या जोर बैठका....

आमदार दिलीप बनकर गटाची पिंपळगावच्या स्व. अशोक बनकर पतसंस्थेत पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी बैठकीचे सत्र सुरू आहे. अद्याप उमेदवाराचा अंतिम शब्द आमदार बनकर यांनी कुणालाच दिलेला नाही.

पण काहींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे. आमदार बनकर हे जुन्या-नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. तशी संबंधितांची कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज दाखल केले जात आहे.

माजी आमदार अनिल कदम गटाची नुकतीच पिंपळगावला सरपंच भास्करराव बनकर यांच्या फॉर्महाऊसवर बैठक झाली. मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे, आनंदराव बोराडे, राजेश पाटील आदी नेते उपस्थित होते.

तोडीस तोड उमेदवार देऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सत्ता मिळवायचीच, असा निश्‍चय या बैठकीत झाल्याचे समजते. दोन्ही गटाच्या जोर बैठकांनी आता वातावरण तापू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT