नाशिक

पिंपळगांवला उन्हाळ कांद्याला साडेपाच हजार रूपयांचा दर

CD
10291 पिंपळगाव बसवंत : उन्हाळ कांद्याचे सुरू असलेले लिलाव. पिंपळगावला उन्हाळ कांद्याला साडेपाच हजार रुपयांचा दर सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. ३१ : बाजार समितीत उन्हाळ कांद्याला पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल असा आकर्षक दर मिळतो आहे. आठ दिवसात पाचशे रुपये प्रतिक्विंटलने दर वधारले आहेत. दुष्काळी स्थितीत कांद्याचे दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलकडे झेपावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पिंपळगाव बाजार समितीत कसमादेसह नाशिक जिल्ह्यातून दररोज नऊ हजार क्विंटलची आवक होत आहे. सध्या मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने दरात तेजी आली आहे. सरासरी चार हजार २५० रुपये तर कमाल पाच हजार सहाशे रुपये असा दर उन्हाळ कांद्याला मिळतो आहे. लाल कांद्याचेही पिंपळगाव बाजार समितीत आगमन झाले आहे. उन्हाळच्या बरोबरीने लाल कांदा भाव खातो आहे. लाल कांद्याला कमाल पाच हजार ४७० तर सरासरी चार हजार ८०० रुपये दर मिळतो आहे. ------ पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला उच्चांकी साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतो आहे. अद्ययावत सुविधामुळे उत्तर महाराष्ट्रातून कांदा लिलावासाठी येत आहे. शेतकऱ्यांना लिलाव अथवा रोख पेमेंटसाठी कोणतीही अडचण येऊन नये म्हणून चोख नियोजन करण्यात आले आहे. - आमदार दिलीप बनकर, सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Tax: पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! 31 ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला; पेट्रोल-डिझेल आता कितीला?

ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी

Viral Bears: ४ अस्वलांचा पिकअपमध्ये धुमाकूळ! स्नॅक्स अन् बिअरचे कॅन पळवले! VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Marathi News Live Updates : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात १२ व्या आरोपीला बेड्या; हरियाणामधून अटक केलेल्या अमरला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी

'क्रिकेटशी मस्ती नाही...', आचरेकर सरांची तीन महत्त्वाची वाक्य कोणती? अमोल मुजुमदारांचा खुलासा; हरमनप्रीतला म्हटलं Best Captain

SCROLL FOR NEXT