नाशिक

बळकावण्याचा कट उघडकीला

CD
पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी बळकावण्याचा कट उघडकीला --- दोघांविरूद्ध गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २७ : पिंपळनेर (ता. साक्री) येथील पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळविण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे, खोटे शिक्के व लेटरपॅडचा वापर करून बनावट सभा दाखविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शांताराम ताराचंद सोनवणे (रा. सटाणा रोड, पिंपळनेर) व भागवत भानुदास सोनवणे (देवपूर, धुळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी आपसात संगनमत करून संस्थेची सूत्रे हाती घेण्यासाठी कट रचला. त्यांनी २१ सप्टेंबर २०२५ ला पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीची वार्षिक किंवा विशेष सभा पार पडल्याचे भासविले. या सभेला २७ सभासद उपस्थित असल्याचे दाखवत त्यांच्या बनावट सह्या, संमतीपत्रे आणि सभेचा खोटा वृत्तांत तयार केला. एवढेच नव्हे, तर ही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून संस्थेच्या नावाने अधिकृत पत्रव्यवहार आणि प्रसिद्धीही केली. संस्थेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ताबा मिळविण्याच्या उद्देशाने संशयितांनी धुळे सहायक धर्मादाय आयुक्तांकडे फेरफार अर्ज क्रमांक १६७/२०२६ दाखल केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संस्थेचे विश्वस्त विवेकानंद नारायण शिंदे (रा. नवापूर रोड, पिंपळनेर) यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पिंपळनेर पोलिसांनी शांताराम सोनवणे व भागवत सोनवणे यांच्याविरुद्ध फसवणूक, कूटरचना व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT