election esakal
नाशिक

Pimplegaon Market Committee : पिंपळगाव बाजार समितीच्या प्रचाराची सोशल मिडीयावर धूम!

सकाळ वृत्तसेवा

Pimplegaon Market Committee : पिंपळगाव बाजार समितीची निवडणुकीचा धुराळा सोशल मिडीयावरही उडालेला आहे. विरोधी नेत्यांवर चिखलफेक करत आपल्या नेत्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

प्रत्येक मतदारांच्या मागे टाईट फिल्डींग लावल्याने त्यांचा भाव वधारला आहे. (Pimplegaon Market Committees election campaign booming on social media nashik news)

सोशल मिडियावरील प्रचारात आजी-माजी आमदार केंद्रस्थानी दिसत आहे. त्यांच्या व्यवसाय व कार्यपध्दतीवर टोकाची टिका होताना दिसत आहे. यात नेटकऱ्यांचे मोठे मनोरंजन होत आहे. अनेक जण सावध प्रतिक्रिया देत आहे.

यात बाजार समितीचे माजी सभापती तानाजी बनकर मात्र या निवडणुकीपासून चार हात दूर असल्याचे चित्र आहे.

सोसायटी व ग्रामपंचायत गटातील लढत काळजाचा ठोका चुकविणाऱ्या ठरणार आहेत. काही निकाल तर एक अंक फरकाने जय पराजय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारामागे टाईट फिल्डींग लावण्यात आल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आपल्या हक्काच्या मतदारांना सहलीला पाठविण्याच्या व थेट मतदान केंद्रावर पाचारण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक लढण्याचा अधिकार बाजार समिती निवडणुकीत दिला. पण शेतकऱ्यांच्या मागे कोण मतदार उभे राहणार असा प्रश्‍न दोन्ही गटाच्या नेत्यांना पडल्याने शेतकरी उमेदवारांना डावलल्याचे चित्र दिसत आहे.

सोसायट्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, बडे व्यापारी, आगामी निवडणुकीत मते मिळवून देणाऱ्या व्यक्तिलाच नेत्यांनी पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी मात्र निवडणुकीपासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT