पान-३ मेन
----------
PML26B10273
पिंपळगाव बसवंत ः संशयित चोरट्य़ाला नागरिकांच्या मदतीने पकडताना पोलिस.
---
PML26B10275
पिंपळगाव बसवंत ः देशमाने यांच्या बंगल्यात चोरट्य़ांनी तोडलेले कपाट.
---------
भारत मोगल ः PML26B10277
-------
५०-४
माजी ग्रामपंचायत सदस्यच निघाला चोर
-------------
पिंपळगाव बसवंतला धाडसी घरफोडी, नागरिकांच्या सतर्कतेने दोघांना रंगेहाथ पकडले
------------
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगांव बसवंत, ता.२७ ः पिंपळगाव बसवंत येथे गजबजलेली नागरी वसाहत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये सोमवारी (ता.२६) मध्यरात्री बंद घरात धाडसी घरफोडीचा प्रयत्न झाला. दीड लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार होण्याच्या डावात असताना शेजारील नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे या चोरट्यांमध्ये पिंपळगाव ग्रामपंचायतीचा माजी सदस्य निघाल्याने शहरात खळबळ उडाली. भारत सुरेश मोगल (रा. भाऊनगर, उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत) असे त्यांचे नाव आहे. दरम्यान संतापलेल्या नागरिकांना संबंधितांची गावातून धिंड काढण्याची मागणी पोलिसांकडे केली.
-------------
पिंपळगावच्या मध्यवर्ती नागरी वसाहत असलेल्या शिवाजीनगरमध्ये (कै) खंडेराव देशमाने चौकात माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश देशमाने, निफाड एज्युकेशन संस्थेचे सचिव अविनाश देशमाने, रामसन्स लॉन्सचे संचालक विनोद देशमाने यांचे निवासस्थान आहे. देशमाने कुटुंबीय गेल्या दोन दिवसापासून नाशिक येथील निवासस्थानी मुक्कामाला होते. चोरटयांनी दोन दिवसापासून टेहळणी करून घरबंद असल्याची खात्री केली. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कटरच्या सहाय्याने खिडकीचे गज तोडून बंगल्यात प्रवेश केला.
१६-१
शेजाऱ्यांची सतर्कता कामी
घरात अंधार असल्याने सोबत आणलेल्या बॅटरीच्या सहाय्याने घरातील कपाटाचा शोधाशोध केली. कपाटातील दीड लाख रूपये रोकड घेऊन पळण्याच्या प्रयत्न केला. कपाट, गज तोडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांना जाग आली. देशमाने यांच्या बंद घरात बॅटरीचा उजेड शेजारच्या नागरिकांच्या दृष्टीस पडला. चोरट्य़ांनी घरात प्रवेश केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी घराला घेराव घातला व पोलिसांना पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून माजी सरपंच भास्करराव बनकर, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, दिलीप मोरे, राजेश पाटील, चंद्रकांत बनकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. चोरटयांची पिंपळगाव शहरातून धिंड काढा, अशी मागणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी चोरट्यांना कठोर शिक्षेचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
१६-१ चौकट
चोरट्य़ांनी घरात केली मद्यपार्टी
मध्यरात्री घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्य़ांनी दारूची पार्टी केली. मद्यधुंद होऊन नंतर ऐवजाची शोधाशोध केली. रोख रक्कम व सोन्याचे ऐवज घेऊन पळ काढण्याच्या मार्गांवर असतानाच नागरिकांनी घराला गराडा घातला. त्याची चाहूल लागताच चोरट्य़ांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेत तेथे दडी मारली. पोलिस व नागरिकांनी शोधाशोध केल्यानंतर चोरट्यांना शोधून काढले. त्यात माजी ग्रामपंचायत सदस्य भारत सुरेश मोगल (रा. भाऊनगर, उंबऱखेड रोड, पिंपळगाव बसवंत) याचा चोरट्यांमध्ये समावेश असल्याचे दिसून आले. रोशन भास्कर मोरे (रा. भाऊनगर, उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत) हा दुसरा संशयित चोरटा पोलिसांनी गजाआड केला. प्रतिष्ठेचे पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्यपद भूषविलेला भारत मोगल हा सराईत चोरटा निघाल्याने एकच खळबळ उडाली.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.