नाशिक

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पिंपळगाव आगारात घंटानाद आंदोलन

CD
पान चार --------------- 10301 पिंपळगाव बसवंत : विविध मागण्यासाठी बस आगाराच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करताना कामगार. एसटी कर्मचाऱ्यांचे पिंपळगाव आगारात घंटानाद आंदोलन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी; संघटनेचा राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा; सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. ३ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी (ता.३) पिंपळगाव बसवंत एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पिंपळगाव आगाराचे अध्यक्ष रवींद्र खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात आगारातील सर्व पदाधिकारी, सभासद तसेच कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घंटानाद करून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, दिवाळी भेट व सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा करावी, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, वेतनवाढीतील त्रुटी दूर कराव्यात, प्रलंबित आर्थिक देणी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, यांसह विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: बनावट विदेशी मद्य साठ्याप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT