Yashwantrao Chavan planetarium esakal
नाशिक

Nashik : तारांगण 7 जुलैपासून होणार खुले

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिकेने उभारलेले यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरला (Yashwantrao Chavan plantetarium and Science Center) मनपा आयुक्त रमेश पवार (NMC commissioner) यांनी भेट दिली. तेथील अत्यावश्यक सुविधांची व्यवस्था करून ७ जुलैपासून नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. फाळके स्मारकात अत्यावश्यक सुविधांची व्यवस्था करून नागरिक व पर्यटकांसाठी (Tourists) खुले केल्यानंतर फाळके स्मारकाला (Dadasaheb Phalke memorial) शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. (planetarium will be open from July 7 Nashik News)

आत्तापर्यंत पंधरा दिवसात साधारण दहा हजार पर्यटकांनी भेट दिली. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरही नागरिक व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने आयुक्त रमेश पवार यांनी निर्देश दिले आहेत. पाहणी दरम्यान बांधकाम व मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्वरित सर्व बाहेरील परिसराची व तारांगणाची साफसफाई करून त्या ठिकाणी रंगरंगोटी करणे, तारांगण परिसरात लॉन्स विकसित करणे, तसेच त्या ठिकाणी असणारे यूपीएस सिस्टम, बॅटरीची दुरुस्ती करण्याची व्यवस्था त्वरित करण्याचे आदेश दिले. याठिकाणी तिकीट विक्री केंद्रात बसण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मक्तेदाराच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर नागरिक व विद्यार्थ्यांसाठी ७ जुलैला खुले करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT